कोल्हापूर : कोरोना महामारीच्या काळात गेले वर्षभर अखंडपणे मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या पंचगंगा स्मशानभूमीतील १३ कर्मचाऱ्यांचा बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
स्मशनभूमीतील सर्व कर्मचारी दिवसरात्र जीवाची पर्वा न करता कर्तव्य बजावत आहे. अशा कर्मचाऱ्यांच्या पाठीवर थाप मारण्यासाठी बुधवारी या कोरोना योद्ध्यांचा गौरव समारंभ आयुक्त कार्यालयातील मीटिंग हॉलमध्ये झाला.
प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आलेल्यांमध्ये बाबासोा पांडुरंग भोसले, सुनील रामचंद्र कांबळे, अनिल प्रताप चौगुले, तुळसीदास यशवंत कांबळे, राजेंद्र सदाशिव कांबळे, प्रदीप बापू बनगे, विलास केरबा कांबळे, विल्सन शाहू दाबाडे, करण विकास बनगे, हिंदूराव शिवाजी भोसले, अशोक पांडुरंग गवळी, रवी वामन कांबळे, जयदीप श्रीकांत कांबळे यांचा समावेश आहे. यावेळी चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पाठीशी प्रशासन सदैव राहील, अशी ग्वाही बलकवडे यांनी दिली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षक जयवंत पवार, स्मशानभूमी अधीक्षक अरविंद कांबळे उपस्थित होते.
फोटो क्रमांक - ०२०६२०२१-कोल -केएमसी
ओळ - कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचगंगा स्मशानभूमीत कोरोना महामारीच्या काळात गेले वर्षभर अखंडपणे मृतांवर अंत्यसंस्कार करणाऱ्या १३ कर्मचाऱ्यांचा बुधवारी प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.