कोल्हापूर : महापुरावेळी काही अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वत:च्या घरात पाणी आले असतानाही आपत्कालीन परिस्थितीत कर्तव्य भावनेने त्यांनी आपले काम प्रामाणिकपणे बजावले. त्यामुळे हे अधिकारी, कर्मचारी कौतुकास पात्र आहेत, असे गौरवोद्गार प्रशासक कादंबरी बलकवडे यांनी रविवारी काढले.
महापुराच्या कालावधीत उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकेकडील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा प्रशासक बलकवडे यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनी प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. त्यावेळी बलकवडे बोलत होत्या.
यापुढील काळातही अधिकारी, कर्मचाऱ्यांनी समर्पण भावनेतून काम केल्यास नागरिकांचा महापालिकेवरील विश्वास दृढ होईल, असेही बलकवडे म्हणाल्या.
सत्कार झालेले अधिकारी - कर्मचारी असे -
मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी मनीष रणभिसे, वाहनचालक संजय पाटील, फायरमन अभय कोळी, जल अभियंता अजय साळुंखे, उपजल अभियंता जयेश जाधव, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, प्रिया पाटील, पंपचालक सतीश इंगळ, मजूर अरविंद यादव, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, सर्व्हेअर तानाजी गेंजगे, मुकादम उमेश माने, कामगार सूर्यकांत यादव, विद्युत विभाग कनिष्ठ अभियंता अमित दळवी, प्रणव आवटे, इलेक्ट्रिक सुपरवायझर सदानंद धनवडे, आरोग्य निरीक्षक राहुल राजगोळकर, सुशांत कांबळे, महेश भोसले, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, मुनीर फरास, मनोज लोट, वैदयकीय अधिकारी डॉ. विद्या काळे, डॉ. विश्वनाथ खैरमोडे, स्टाफ नर्स संगीता गावडे, आशा सेविका अस्मिता केर्लेकर.
फोटो क्रमांक - १६०८२०२१-कोल-केएमसी०३
ओळ - महापुराच्या काळात चांगली कामगिरी करणाऱ्या कोल्हापूर महानगरपालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सत्कार रविवारी प्रशासक कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आला.