कोल्हापूर : महापुरासह कोणत्याही आपतकालीन घटनेच्या सामन्यासाठी महापालिकेच्या अग्निशमन दलात अत्याधुनिक यंत्रसामग्री दाखल झाल्या आहेत. जीवित हानी होऊ नये, तातडीने आपतकालीन परिस्थिती हाताळता यावी, यासाठी ही यंत्रसामग्री महत्त्वाची ठरणार आहे. त्याची प्रात्यक्षिके सोमवारी पंचगंगा घाटावर झाली.१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाइफलाइन लाँचर, कोसळलेल्या इमारतीमधील व्यक्तिस सुखरूप बाहेर काढण्यासाठी आवश्यक असणारा लोकेशन कॅमेरा आणि आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजीन कॅमेराचा यामध्ये समावेश आहे. दोन दिवसांपूर्वीच अद्ययावत अशी यंत्रसामग्री दाखल झाली आहे, यामुळे अग्निशमन विभाग आणखीन भक्कम झाला आहे.१५० मीटरवरील पाण्यात अडकलेल्यांसाठी लाँचरमहापालिकेच्या अग्निशमन दलात अद्ययावत अशी मशनरी दाखल झालेल्या आहेत. यामध्ये लाइफलाइन लाँचरचा समावेश आहे. याच्या मदतीने १०० ते १५० मीटर अंतरावरील पाण्यातील अडकलेल्या व्यक्तिजवळ दोरी जाईल व लाइफ जॅकेट त्याच्यापर्यंत पोहोचेल, अशी सुविधा असणारी यंत्रणा आहे.आधुनिक तंत्रज्ञानाचा व्हिक्टीम लोकेशन कॅमेरा महापालिकेच्या यंत्रसामग्रीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान असलेला कॅमेराही यंदा दाखल झालेला आहे. धोकादायक इमारत कोसळली असल्यास किंवा अरुंद जागेत, बोअरवेलमध्ये एखादा व्यक्ति अडकून पडल्यास त्याचे बचावकार्य करण्यासाठी महत्त्वाचा ठरणारा हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा अडकलेल्या व्यक्तिपर्यंत जाऊन त्याची चित्रफित, त्याच्याशी संवाद साधणे शक्य होते. संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडकलेला आहे, याची माहिती त्वरित मिळत असल्याने जीवित हानी होण्यापासून बचाव करणे यामुळे शक्य होते.आगीत अडकलेल्यांच्या बचावासाठी थर्मल इमॅजिन कॅमेरा आगीसारखी घटना घडल्यास धुरामध्ये अथवा आगीच्या लोटात संबंधित व्यक्ति कोणत्या ठिकाणी अडचणीत सापडली आहे, याचा शोध घेणे, तेथील तापमान किती आहे, याची माहिती मिळण्यासाठी महत्त्वाची असणारे थर्मल इमॅजिन कॅमेराही अग्निशमन दलाच्या ताफ्यात दाखल झाला. या कॅमेऱ्याच्या सहाय्याने धुरामध्ये अडकलेल्या किंवा आगिमध्ये अडकलेल्या व्यक्तिचा शोध घेऊन त्याला वाचवले जावू शकते.
आधुनिक साधने खरेदीसाठी जिल्हा नियोजन मंडळाकडे निधीची मागणी केली होती. राज्य शासनाने तत्काळ निधी उपलब्ध केला. त्यातून लाइफलाइन लाँचर, लोकेशन कॅमेरा आणि थर्मल इमॅजीन कॅमेरा महापालिकेच्या ताफ्यात दाखल झाले.- रणजित चिले,मुख्य अग्निशमन अधिकारी