कोल्हापूर : येथील शहीद राजू जाधव मेमोरियल फौंडेशनतर्फे दि. २३ ते २५ डिसेंबरदरम्यान गगनगड ते दाजीपूर अशी घनदाट जंगलातील साहसी पदभ्रमंती मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती कॅम्प लीडर पोलीस निरीक्षक संजय जाधव यांनी दिली.
पहिल्या दिवशी मोरजाईचा सडा येथील सूर्यास्त पाहून रात्री स्लाईड शो, आकाशदर्शन, कॅम्प फायर आणि बोरबेटला मुक्काम असे नियोजन आहे. दुसºया दिवशी जंगल तुडवत दुपारी एक वाजेपर्यंत बायसन टॉवर, सायंकाळी पाच वाजेपर्यंत गगनगिरी आश्रमात रात्रीचे जेवण, कॅम्प फायर, तिसºया दिवशी दाजीपूरच्या जंगलात पदभ्रमंती केल्यानंतर दुपारनंतर कोल्हापूरला परत असे या मोहिमेचे नियोजन आहे.
फौंडेशनचे अध्यक्ष अॅड. विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली कॅम्प लीडर संजय जाधव, ग्रुप लीडर हृषिकेश केसकर, नितीन जाधव, सतीश पाटील, क्षितिजा जाधव, संग्राम पाटील (सडोलीकर), सेंट्रल एक्साईजचे सुपरिंटेंडेंट राजेंद्र गुंडाळे, अमर पाटील, अविनाश लाड, पोलीस निरीक्षक प्रवीण चौगुले, सार्थक जाधव, राजू माने यांच्यासह बोरबेट आणि महादेव मंदिराच्या (गगनगिरी आश्रम) व्यवस्थेसाठीची समिती कार्यरत आहे.सेव्हन सिस्टर मोहीम २०१८ मध्येकोल्हापूर माउंटेनिअरिंग अॅडव्हेंचर्स क्लबच्या माध्यमातून १९७८ पासून दाजीपूर पदभ्रमंती मोहीम अविरत सुरू आहे. याच क्लबचे हरहुन्नरी, तडफदार साहसी फौजदार राजू जाधव मुंबईत शीख अतिरेक्यांशी झालेल्या धुमश्चक्रीत हुतात्मा झाले. त्यांची आठवण म्हणून १९९२ मध्ये स्थापन झालेल्या फौंडेशनने युवक-युवतींमध्ये साहसी वृत्ती वाढीस लागावी म्हणून हिमालयात मोहिमा यशस्वीपणे केल्या. २०१८ मध्ये नॉर्थ-ईस्ट हिमालयीन सेव्हन सिस्टर मोहीम आहे. सहभागासाठी अध्यक्ष अॅड. विजय जाधव, शारदा हौसिंग सोसायटी, राजारामपुरी, आठवी गल्ली, कोल्हापूर येथे संपर्क साधावा.