केंद्र शासनाने ही पुरस्कार योजना शहरी भागातील सर्वांना परवडणारी घरे उपलब्ध करून देणाऱ्या विकसकांना योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी केली आहे. दिल्ली येथे विकसकांना त्यांचे प्रकल्पांचा नियोजित आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले असून, यामध्ये विकसकांनी केलेले डिझाईन, त्यांनी खरेदीदारांना पुरविलेल्या सेवा-सुविधा, नावीण्यपूर्ण विकसित आराखडा यासाठी नामंकित तज्ज्ञांच्या पॅनेलद्वारे व्यापक गुणवत्तेच्या मूल्यांकनातून हा पुरस्कार दिला गेला आहे.
प्रधानमंत्री आवास योजना शहरीअंतर्गत राज्यातील पहिला प्रकल्प सुरू करण्याचा मान रामसिना ग्रुपला मिळाला आहे. या योजनेंतर्गत पहिला २५० सदनिकांचा प्रकल्प लोकनागरी नागाळा पार्क, विन्स हॉस्पिटल येथे सुरुवात झाली आहे. प्रकल्प जून २०२२ मध्ये पूर्ण होऊन इमारत सदानिकाधारकांना हस्तांतरण करण्यात येणार असून, ग्राहकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन रामसिना ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक सचिन ओसवाल, विकेश ओसवाल यांनी केले.
फोटो : १९०३२०२१ कोल रामसिना सर्टीफेकट