चाटे क्लासेसमध्ये अभ्यासक्रमाची सुरुवातच स्टेट बोर्ड व सीईटी अशी एकत्रित करत असल्यामुळे विद्यार्थ्यांचा बोर्ड परीक्षा आणि सीईटी परीक्षेचा अभ्यास सोबतच होतो. अर्थातच याचा फायदा विद्यार्थ्यांना स्वत:ची क्षमता ओळखून गुणवत्तेमध्ये वाढ करण्यासाठी होतो. आजपर्यंतच्या निकालामधील चाटे समूहाचा आलेख चढता राहिला आहे. सन २०२० च्या निकालामध्येही सौरभ जोग या विद्यार्थ्याने बारावीमध्ये ९६.१५ टक्के गुण आणि एमएचटी-सीईटीमध्ये १०० पर्सेंटाईल गुण मिळवून राज्यात सर्वप्रथम येण्याचा मान मिळविला. व्यंकटेश राजमाने या विद्यार्थ्याने नीट परीक्षेत ६६२ गुण मिळवून मुंबईतील जी.एस. मेडीकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळविला. हे चाटे शिक्षण समुहाच्या कार्यपद्धतीमुळे शक्य झाले आहे. अकरावी सायन्सच्या विद्यार्थ्यांनी चाटे क्लासेसच्या स्पेशल बॅचेसमध्ये प्रवेश घेवून उज्ज्वल यशाचा श्रीगणेशा करावा, असे आवाहन चाटे समूहाच्या कोल्हापूर विभागाचे संचालक प्रा. डॉ. भारत खराटे यांनी केले आहे.
चौकट
वर्गांना परवानगी
कोरोनामुळे इयत्ता अकरावीचे वर्ग सुरू होण्यामध्ये संद्गिधता निर्माण झाली होती. शासकीय अधिसूचनेनुसार इयत्ता नववी ते बारावीच्या वर्गांना परवानगी मिळाल्यामुळे अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती प्रा. खराटे यांनी दिली.