शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभा निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज; किती वाजता सुरू होणार मतदान? ‘या’ गोष्टी लक्षात ठेवाच
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप, देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
3
भाई ठाकूर यांचे भाऊ ते बविआ प्रमुख; विरारमधील 'राडा' प्रकरणाने चर्चेत आलेले हितेंद्र ठाकूर कोण?
4
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाल्यास त्याचे खापर विनोद तावडेंवर फोडले जाईल”: पृथ्वीराज चव्हाण
5
मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याने कारस्थान रचलं? विनोद तावडे म्हणाले, "मी तिकडे जाणार हे..."
6
Vinod Tawde: त्या हॉटेलात महिला, कोपऱ्या कोपऱ्यात लपलेल्या; क्षितीज ठाकुरांचे खळबळजनक आरोप
7
Maharashtra Assembly Election 2024 : लोकसभेवेळी धक्का देणारा मराठवाडा भाजपाला देणार साथ? हे मुद्दे ठरू शकतात 'मास्टर स्ट्रोक'
8
...म्हणून देशाची राजधानी दिल्लीतून दुसरीकडे हलवा, शशी थरूर यांनी दिला सल्ला
9
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "विरोधकांसाठी 'ही रात्र शेवटची, ही ...", महाराष्ट्रात 'कॅश फॉर व्होट'वर भाजपची प्रतिक्रिया
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
12
अजबच! सहा हजारांच्या लाच प्रकरणी सरकारी कर्मचाऱ्याला निवृत्तीनंतर ५ वर्षांनी शिक्षा
13
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
14
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
15
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
16
हिटमॅनचा परफेक्ट फॅमिली मॅन सीन! बाबांचा बर्थडे सेलिब्रेट करताना दिसला रोहित शर्मा (VIDEO)
17
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
18
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
19
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
20
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा

पानसरे खटल्यात महाधिवक्ता मांडणार सरकार पक्षाची बाजू

By admin | Published: January 15, 2016 12:53 AM

सरकारतर्फे नियुक्ती : सुनावणी लांबणीवर

कोल्हापूर : ज्येष्ठ नेते गोविंद पानसरे यांच्या हत्येचा खटला कोल्हापूरबाहेर चालवावा, अशी मागणी संशयित आरोपी समीर गायकवाड याने केली आहे. या खटल्यात सरकार पक्षाच्यावतीने आता महाधिवक्ता श्रीहरी अणे हे बाजू मांडणार आहेत. राज्य सरकारने त्यांची नियुक्ती केली आहे. न्यायाधीश श्रीमती साधना जाधव या रजेवर असल्याने या खटल्याची गुरुवारी सुनावणी झाली नाही. त्यामुळे हा खटला कोल्हापुरात चालणार की अन्यत्र याचा निर्णय प्रलंबित राहिला. सुनावणी असल्याने श्रीमती पानसरे व ज्येष्ठ विधिज्ञ अभय नेवगी न्यायालयात गेले होते; परंतु सकाळीच त्यांना ही सुनावणी होणार नसल्याचे समजले. या खटल्यात महाधिवक्ताची नियुक्ती करावी, अशी विनंती श्रीमती शैला दाभोलकर व पानसरे कुटुंबीयांच्यावतीने त्यांच्या स्नुषा मेघा पानसरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. हा खटला निष्पक्षपातीपणे चालावा, यासाठी तो कोल्हापूरच्या बाहेर चालवावा, अशा मागणीची याचिका संशयित आरोपी समीर विष्णू गायकवाड (वय ३२, रा. दक्षिण शिवाजीनगर, मोती चौक, शनिमारुती मंदिराजवळ, सांगली, सध्या कळंबा कारागृह, कोल्हापूर) याने १२ डिसेंबरला वकिलांमार्फत मुंबई उच्च न्यायालयात केली आहे. या खटल्यामध्ये पानसरे कुटुंबीयांना सहभागी करून घ्यावे, असे प्रतिज्ञापत्र मेघा पानसरे यांनी बुधवारी (दि. १३) दाखल केले आहे. हा खटला कोल्हापूरबाहेर हलविण्यास पानसरे कुटुंबीयांचा विरोध आहे. खटला मुंबई किंवा अन्यत्र हलविण्यामुळे शोधयंत्रणा व अन्य साक्षीदारांवर त्याचा परिणाम होईल, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. गायकवाड याच्यावतीने मुंबईतील सनातन संस्थेचे वकील अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी ही याचिका (क्रमांक ८४०/२०१५) दाखल केली आहे. त्यामध्ये राज्य सरकारला प्रतिवादी करण्यात आले आहे. ही याचिका कोल्हापुरात का नको, याची चार कारणे त्यांनी या याचिकेत दिली आहेत. पानसरे यांच्यावर गतवर्षी दि. १६ फेब्रुवारीस ते सकाळी त्यांच्या सागरमाळ परिसरातील बंगल्यातून फिरायला गेल्यावर गोळ््या झाडण्यात आल्या. त्यांचा त्यामध्ये दि. २० फेब्रुवारीस मृत्यू झाला. याप्रकरणी सनातन संस्थेचा प्रमुख साधक असलेल्या समीर गायकवाड यास राजारामपुरी पोलिसांनी दि. १४ सप्टेंबर २०१५ ला अटक केली. त्याच्यावर या खूनप्रकरणी राज्य गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने दोषारोपपत्र दाखल केले. सध्या गायकवाड कोल्हापुरातील कळंबा मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहे. कोल्हापूर पोलिसांचा विरोधहा खटला हलविण्यास विरोध करणारे प्रतिज्ञापत्र तपास अधिकारी व कोल्हापूरचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी गुरुवारी न्यायालयात सादर केले. कोल्हापूर बार असोसिएशनने गायकवाड यास वकील मिळू नये, असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचेही बार असोसिएशनचे पत्र त्यांनी न्यायालयात सादर केले.महाधिवक्ता का...एखादा खटला जेव्हा महत्त्वाचा असतो, त्यामध्ये घटनात्मक वैधतेविषयी काही मुद्दे उपस्थित होतात तेव्हा राज्य शासन सरकार पक्षाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी महाधिवक्ताची नियुक्ती करते. हे घटनात्मक पद आहे. या खटल्यात त्यांची नियुक्ती झाल्यामुळे पानसरे कुटुंबीयांची बाजू बळकट झाल्याचे मानण्यात येते.