शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

आप्पाचीवाडी लघुपाटबंधारे प्रकल्प लालफितीत अडकला

By admin | Published: May 09, 2017 12:25 AM

निधीअभावी प्रकल्प रखडणार ? : प्रकल्पाकडे तालुक्यातील लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कगारगोटी : भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, लोटेवाडी, म्हसवे येथील शेतकऱ्यांनी पुनर्वसनासाठी न्यायालयात धाव घेतल्याने नऊ वर्षे रखडलेला भुदरगड तालुक्यातील आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प सुधारित निधीअभावी ठप्प होत चालल्याने या भागाचा पाणीप्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शासनाने या प्रकल्पासाठी सुधारित निधी तत्काळ मंजूर करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी, ग्रामस्थांतून होत आहेमिणचे खोरीतील लोटेवाडी, आप्पाचीवाडी, पंडिवरे, बसुदेव धनगरवाडा, मिणचे बुद्रुक, नवरसवाडी, मोरस्करवाडी, बोगार्डेवाडी या जिथे पाण्याचा कुठलाच स्रोत नाही अशा दुर्गम डोंगराळ भागातील गावांतील शेतकऱ्यांसाठी आप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पास २००७ साली शासनाच्या जलसंधारण विभागाने मंजुरी दिली. २७.५७ मी. उंची, ३ मीटर रुंदी, २६५ मी. लांबी, साठवण क्षमता १३८९ घनमीटर, सांडवा ३५ मीटर व कालवा ४ कि.मी. व १५५ हेक्टर लाभक्षेत्र असलेल्या प्रकल्पाचा ४ कोटी २० लाख रुपयांचा खर्च प्रारंभीस मंजूर केला होता. हा निधी जिल्हा नियोजन मंडळाने मंजूर केला होता. त्यानंतर येथील शेतकऱ्यांच्या जमिनीचा मोबदला व पुनर्वसनाचा प्रश्न अनेक वर्षे सुटला नव्हता. त्यामुळे शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयीन प्रक्रियेमुळे गेली नऊ वर्षे या प्रकल्पाचे काम रखडले होते. पुनर्वसनाच्या प्रश्नावर तोडगा निघाल्यानंतर फेब्रुवारी २०१६ ला पुन्हा प्रकल्पाचे काम सुरू झाले, पण जेवढा निधी मिळाला, तेवढेचे काम झाल्याचे संबंधित खात्याचे म्हणणे आहे. उर्वरित कामासाठी सुधारित अंदाजपत्रक २० कोटी, ५४ लाख रुपये केले आहे. गेल्या नऊ वर्षांत ४ कोटींचा प्रकल्प २० कोटी ५४ लाखांवर गेला आहे. संबंधित खात्याने सुधारित निधीचा प्रस्ताव शासनदरबारी पाठवला आहे. एवढा मोठा निधी उपलब्ध होईपर्यंत पुढील काम पूर्णत: थांबणार आहे. या प्रकल्पामुळे लोटेवाडी, बोगार्डेवाडी, आप्पाचीवाडी, मिणचे बुद्रुक, पंडिवरे, मोरस्करवाडी, नवरसवाडी या गावांचा पिण्याच्या पाण्यासह शेतीच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. माजी आमदार बजरंग देसाई यांनी लोंडवीर देवालय येथे पाणी परिषद घेऊन येथील शेतकऱ्यांना दिलासा दिला होता. त्यानंतर माजी आमदार के. पी. पाटील यांनीही या प्रकल्पाच्या कामाचा गांभीर्याने विचार केला नाही. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकालातआप्पाचीवाडी लघु पाटबंधारे प्रकल्प येथील शेतकऱ्यांची जीवनवाहिनी आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकालात निघून शेतीचे रूपांतर कोरडवाहूतून निघून हरितक्रांतीचे स्वप्न साकार होणार आहे. शासन दरबारी या प्रकल्पाला निधी मंजूर झाल्यास प्रकल्पाचे काम सुरू होईल. त्यासाठी योग्य अंमलबजावणीची नितांत गरज आहे.