उचगाव : कोल्हापूरविमानतळाकडील हवाई फिल्डच्या पश्चिमेकडे विमान उतरविण्याचा /उड्डाणाच्या मार्गावर अडथळे असल्याने रन-वे (दृश्य उड्डाण नियम) ऑपरेशनसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरण डीजीसीएफकडून एरोड्रोम परवानगी मिळाली असल्याची माहिती प्रकल्प संचालक अनिल शिंदे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली.एरोड्रोम परवानगीमुळे सर्व प्रकारच्या हवामान परिस्थितीमध्ये इन्स्ट्रुमेंट फाइट रुल्स अर्थात IFR ऑपरेशनसाठी कोड ३-सी एरोड्रॉम म्हणून जारी करण्यात आला आहे. यापूर्वी भारतीय विमानतळ प्राधिकरणकडून उजळाईवाडी कोल्हापूर येथील विमानतळासाठी कोड ३ वॉलवेदर आयएफआर या वर्गातील एरोड्रॉम परवान्याची यशस्वी नूतनीकरण करण्यात आले होते. सुरक्षित उपकरांच्या साहाय्याने विमान उडविले जात होते. ३ सी १२०० मीटर ते १८०० मीटरपर्यंतची धावपट्टीची लांबी आणि २४ मीटर ते ३६ मीटरदरम्यान पंख असलेल्या विमानांना हाताळू शकते. अशा उपकरणाला एरोड्रॉम असे संबोधले जाते. या परवान्याची विमानतळ प्राधिकरणाकडे भर पडली आहे.हा परवाना सर्व हवामानातील IFR ऑपरेशनसाठी जारी केला आहे. परंतु केवळ रन-वे २५ वरून नाइट लँडिंगपुरता मर्यादित आहे. यापूर्वी या परवान्याचे दर दोन वर्षांनी नूतनीकरण केले जात होते. परंतु डीजीसीएने यावेळी पाच वर्षासाठी अर्थात १४/१२/२८ पर्यंत हा परवाना जारी केला आहे.नाइट लँडिंगचा मार्ग मोकळागेल्या वर्षभरापासून कोल्हापूर विमानतळ विस्तारीकरणांतर्गत विविध विकासकामे प्रगतिपथावर आहेत. कोल्हापुरातील नाइट लँडिंगबाबत नागरी उड्डाण संचालनालय यांनी अडथळे काढण्याच्या सूचना दिल्या होत्या. एरोड्रॉममुळे मार्ग मोकळा झाला आहे.
कोल्हापूर विमानतळासाठी एरोड्रॉमचा परवाना, उड्डाणाला गती मिळणार
By ऑनलाइन लोकमत | Published: December 09, 2023 3:49 PM