सडोली (खालसा) : भोगावती नदी पात्रातील पाणी दूषित झाल्याने हळदी (ता. करवीर) येथे शनिवारी सकाळी हजारो मासे मृत्युमुखी पडले. पाणी प्रदूषित झाल्याने नदीकाठच्या गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. याची दखल घेऊन प्रदूषण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अविनाश कडवे व करवीरचे तहसीलदार अनंत दिघे यांनी हळदी येथे भेट देऊन पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले असून, भोगावती नदीपात्रात पाटबंधारे विभागाकडून उच्च दाबाने पाणी सोडण्यात आल्यामुळे व ३१ तासांनंतर अधिकाºयांनी पाणी नमुने घेतले खरे परंतु याचा अहवाल नेमका काय येणार? असा सवाल नदीकाठाचे नागरिक करीत आहेत.गेले चार दिवस भोगावती नदीपात्रातील पाणीपातळी खालावली होती. शनिवारी सकाळी पहाटेपासून नदीपात्रातील पाण्याचा रंग काळा व पाण्याला दुर्गंधी सुटली होती. हे पाणी प्रदूषित झाल्याने पाण्यातील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याने पाण्यावर तंरगत असल्याचे नागरिकांना दिसताच मासे पकडण्यासाठी नदीपात्रात हळदी व परिसरातील लोकांची झुबंड उडाली होतीप्रदूषण करणाºया घटकांवर कारवाई करण्यासंदर्भात त्यांनीच आता आदेश देण्याची गरज आहे. भोगावती नदीत मोठ्या प्रमाणात प्रदूषण झाल्यामुळे दूषित पाणी खाली घालविण्यासाठी पाटबंधारे विभागाने उच्च दाबाने पाणी सोडल्याने हेच पाणी हळदी बंधाºयाच्या खाली गेल्यामुळे बंधाºयाखालील गावांनाही व कोल्हापूर शहरालाही हे दूषित पाणी प्यावे लागले.प्रदूषण मंडळाच्या अधिकाºयांनी हळदी येथील बंधारा, परिते बंधारा, भोगावती साखर कारखान्याचे जलशुद्धिकरण केंद्र, शेती व नाल्यातील पाणी नमुने व मृत मासे तपासणीसाठी घेतले आहेत.
३१ तासांनंतर अधिकाºयांना जाग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2017 12:06 AM