शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
2
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
3
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
4
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
5
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
6
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
7
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
8
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
9
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळा सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 10:37 AM

दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या सर्व ८५० माध्यमिक शाळांची सुरुवात बुधवारपासून झाली. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. खासगी प्राथमिक, महानगरपालिकेच्या शाळा या आज, गुरुवारपासून भरणार आहेत.

ठळक मुद्देखासगी प्राथमिक, महानगरपालिकेच्या शाळा आज भरणारविद्यार्थ्यांच्या गर्दीने या शाळांचा परिसर गजबजून गेला अनेक शाळांमध्ये परीक्षेच्या संकलित चाचणीची तयारीपुन्हा घ्यावी लागणार परीक्षा

कोल्हापूर ,दि. ०२ : दिवाळीच्या सुटीनंतर कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांची सुरुवात बुधवारपासून झाली. त्यामुळे शाळांचा परिसर विद्यार्थ्यांनी फुलून गेला. खासगी प्राथमिक, महानगरपालिकेच्या शाळा या आज, गुरुवारपासून भरणार आहेत.

यावर्षी दिवाळीच्या सुटीची सुरुवात दि. १६ आॅक्टोबरपासून झाली. ही सुटी संपल्यानंतर जिल्हा परिषदेच्या दोन हजार प्राथमिक शाळा या ३० आॅक्टोबरपासून सुरू झाल्या. जिल्ह्यातील विविध माध्यमांच्या ८५० माध्यमिक शाळा बुधवारपासून सुरू झाल्या आहेत. त्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून विद्यार्थ्यांच्या गर्दीने या शाळांचा परिसर गजबजून गेला.

शहरात खासगी प्राथमिक आणि महानगरपालिकेच्या एकूण १५० शाळा आहेत. त्या आज, गुरुवारपासून भरणार आहेत. संकलित मूल्यपान चाचणी (एक) दि. ८ ते ११ नोव्हेंबर दरम्यान होणार आहे. त्याची तयारी, अभ्यासाची लगबग आता शाळांमध्ये सुरू झाली आहे.

दरम्यान, इयत्ता पहिली व दुसरीच्या मराठी व गणित, तिसरी ते पाचवीच्या मराठी, गणित, इंग्रजी आणि सहावी ते आठवीच्या मराठी, गणित, इंग्रजी, विज्ञान विषयाच्या प्रश्नपत्रिका शासनाकडून दिल्या जातात. यावर्षी शासनाने संबंधित विषयांच्या परीक्षा दिवाळीच्या सुटीनंतर, तर समाजशास्त्र, हिंदी अशा अन्य विषयांची परीक्षा शाळांनी आपआपल्या पातळीवर नियोजन करून घेण्याची सूचना केली होती. त्यानुसार अनेक शाळांमध्ये परीक्षेच्या तयारीची बुधवारपासून सुरूवात झाली.

पुन्हा घ्यावी लागणार परीक्षाशासनाच्या सूचनेला बगल देऊन काही शाळांनी मराठी, गणित, इंग्रजी आणि विज्ञान विषयाची परीक्षा या दिवाळीची सुटी सुरू होण्यापूर्वी घेतल्या आहेत. शासनाकडून प्रश्नपत्रिका मिळालेल्या नसून देखील त्यांनी या विषयांच्या परीक्षा घेतल्या आहे. मात्र, आता शासनाकडून प्रश्नपत्रिका उपलब्ध झाल्या असल्याने अशा शाळांना संबंधित विषयाच्या परीक्षा पुन्हा घ्याव्या लागणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अतिरिक्त ताण पडणार आहे. 

 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी