शहरं
Join us  
Trending Stories
1
हाती 'धनुष्यबाण', कुडाळमधून विजयाचा निर्धार; शिवसेना प्रवेशानंतर निलेश राणे भावूक
2
मावळमध्ये भाजपाचा सांगली पॅटर्न; राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देण्याची तयारी
3
मनसेची १३ जणांची तिसरी यादी जाहीर; नाशिकमध्ये भाजपाला अन् पालघरमध्ये काँग्रेसला धक्का
4
शिवसेनेच्या पहिल्या यादीत चूक, उमेदवार बदलणार?; राऊतांनी पत्रकार परिषदेत केले कबूल
5
अखेर ठरलं! ८५-८५-८५ मविआच्या फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब; उर्वरित जागांचं गणित कसं असणार?
6
'सीमेवरील शांततेला प्राधान्य', पंतप्रधान मोदी आणि शी जिनपिंग यांच्यात 50 मिनिटांची बैठक
7
Mahayuti Seat update: साताऱ्यात महायुतीचा विद्यमान आमदारांवरच भरोसा! 
8
इस्रायलची मोठी कारवाई; हिजबुल्लाच्या नसरल्लाहनंतर आता हाशिम सफीद्दीनचाही केला खात्मा
9
Maharashtra Election 2024: भाजपसमोर बंड थंड करण्याचे आव्हान; नाशिकमध्ये समीकरण काय?
10
मोठी बातमी: CM शिंदेंविरोधात केदार दिघे; ठाकरेंच्या शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर!
11
तुर्कीची राजधानी अंकारामध्ये मोठा दहशतवादी हल्ला; अनेकांचा मृत्यू
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : सकाळी पक्षप्रवेश अन् संध्याकाळी मिळालं तिकीट; के.पी. पाटलांना दिली उमेदवारी; शाहूवाडीतही शिलेदार मैदानात उतरवला
13
मुंबईतील 'या' १३ जागांवर ठाकरेंचे शिलेदार ठरले; शिवडी मतदारसंघात ट्विस्ट? 
14
जागावाटपाआधीच ठाकरेंकडून AB फॉर्म वाटप; नाशिक मध्य मतदारसंघात काँग्रेस बंडखोरी करणार
15
जालन्यात शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांविरोधात रावसाहेब दानवेंच्या भावाने ठोकला शड्डू
16
Madha Vidhan Sabha 2024: चार वेळा काँग्रेस, पाच वेळा राष्ट्रवादी, शेकापला एकदा मिळाली संधी!
17
अद्भुत! झिम्बाब्वेने ट्वेंटी-२० मध्ये केल्या तब्बल ३४४ धावा; सिकंदर रझाची झंझावाती खेळी
18
Maharashtra Vidhan Sabha Election : बारामतीचं ठरलं! काका विरोधात पुतण्या निवडणूक लढणार? जितेंद्र आव्हाडांनी दिले संकेत
19
Virat Kohli Record : पुण्याच्या मैदानात किंग कोहलीच्या निशाण्यावर असतील हे ५ विक्रम 
20
फडणवीसांची शिष्टाई, राज पुरोहित आणि राहुल नार्वेकरांमध्ये दिलजमाई, कुलाब्यातील बंड शमवण्यात भाजपाला यश 

वडिलानंतर मुलगाही आमदार.. कोल्हापूरकरांनी सहाजणांचे निवडले वारसदार

By पोपट केशव पवार | Published: October 23, 2024 4:02 PM

कर्तृत्व पाहूनच लोकांनी दिली संधी

पोपट पवारकोल्हापूर : राजकारणात एकाच घराण्याला जनता कधी स्वीकारते, तर अनेकदा ती स्वीकारत नाही, असे चित्र गेल्या साठ वर्षांत राज्यातील अनेक मतदारसंघांत दिसून आले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजकारणात मात्र एकाच घरात वडील व मुलालाही आमदारकीचा गुलाल अनेक मतदारसंघांनी लावला आहे. जिल्ह्यातील बाप-लेकांच्या सहा जोड्यांना आमदारकी मिळाली आहे. डॉ. डी. वाय. पाटील, कल्लाप्पाण्णा आवाडे, आनंदराव देसाई, बाबासाहेब पाटील-सरुडकर, जयवंतराव आवळे व नरसिंग गुरुनाथ पाटील यांच्यानंतर त्यांच्या मुलांनाही जनतेने स्वीकारल्याचे दिसते.सरुडकर पिता-पुत्रांना दिली संधीशाहूवाडी मतदारसंघातून बाबसाहेब पाटील सरुडकर हे १९८० व १९९० असे दोन वेळा आमदार होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सत्यजित यांना येथील जनतेने २००४ व २०१४ मध्ये विधानसभेत जाण्याची संधी दिली.डी. वाय. पाटील यांच्यानंतर सतेज पाटीलही विधानसभेतपन्हाळा मतदारसंघातून डॉ. डी. वाय. पाटील हे १९६७ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे पुत्र सतेज पाटील यांनी २००४ मध्ये करवीरमधून अपक्ष उमेदवारी करत बाजी मारली. पुढे २००९ मध्ये कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून त्यांनी विजय मिळवला.हातकणंगलेत आवळे बापलेकांची किमयाहातकणंगले विधानसभा मतदारसंघातून जयवंतराव आवळे तब्बल पाचवेळा विधानसभेत गेले आहेत. ते राजकारणातून निवृत्त झाल्यानंतर त्यांचे पुत्र राजूबाबा आवळे यांनाही लोकांनी २०१९ च्या निवडणुकीत विधानसभेत जाण्याची संधी दिली.चंदगडमध्ये पाटील पिता-पुत्रांना गुलालचंदगडमध्ये १९९० मध्ये काँग्रेसकडून, तर २००४ मध्ये जनसुराज्यकडून नरसिंग गुरुनाथ पाटील विजयी झाले होते. त्यांच्यानंतर पाच टर्मनंतर त्यांचे चिरंजीव राजेश पाटील यांनी २०१९ च्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधत विजय मिळवला.आवाडे पिता-पुत्र तीन वेळा विधानसभेतजिल्ह्यातील मातब्बर आवाडे कुटुंबातील पिता-पुत्रांना इचलकरंजीकरांनी गुलाल लावला आहे. १९८० मध्ये कल्लाप्पण्णा आवाडे हे या इचलकरंजी मतदारसंघातून निवडून गेले होते. पुढे ते लोकसभेत गेल्याने येथील जनतेने त्यांचे चिरंजीव प्रकाश आवाडे यांना १९८५, १९९५, १९९९, २००४ व २०१९ असे तब्बल पाचवेळा आमदार म्हणून विधानसभेत जाण्याची संधी दिली.देसाई घराण्यात बापलेकांना आमदारकीराधानगरी-भुदरगड मतदारसंघातून आनंदराव देसाई व बजरंग देसाई या बापलेकांना आमदारकी मिळाली आहे. १९६२ च्या पहिल्या निवडणुकीत भुदरगडमधून काँग्रेसकडून आनंदराव देसाई विजयी झाले होते. त्यांच्यानंतर त्यांचे चिरंजीव बजरंग देसाई देसाई हे १९८५ च्या निवडणुकीत काँग्रेसकडून विधानसभेत गेले.पतीनंतर पत्नी आमदारहातकणंगले मतदारसंघातून निवडून गेलेल्या बाबासाहेब खंजिरे यांच्यानंतर पुढे शिरोळ मतदारसंघातून त्यांच्या पत्नी सरोजिनी खंजिरे या १९८५ मध्ये आमदार झाल्या. बाबासाहेब कुपेकर यांच्या पश्चात संध्यादेवी कुपेकर, संजयसिंह गायकवाड यांच्यानंतर संजीवनीदेवी गायकवाड, चंद्रकांत जाधव यांच्यानंतर जयश्री जाधव यांना आमदारकी मिळाली.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण