तेरा सदस्यसंख्या संख्या असणाऱ्या या ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी नवणे गटाकडे दहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे संख्याबळ होते, तर विरोधी गटाकडे तीन सदस्य होतो; पण बुधवारी सत्ताधारी गटातीलच दोघांनी उपसरपंच पदासाठी फॉर्म भरले आणि वातावरण चांगलेच तापले. सत्ताधारीतील एका गटाने विरोधी तीन सदस्यांना विश्वासात घेत विरोधातील तीन व दहामधील चार सदस्य एका बाजूला, तर सत्ताधारीतील दुसर्या गटाचे सहा सदस्य व लोकनियुक्त सरपंच असे सात सदस्यसंख्या बळ निर्माण केले व सरपंच यांच्या विशेष अधिकाराच्या वापराची ताकद दाखवून संख्याबळ आठवर नेण्याचा कट आखला. इथेच सत्ता समीकरणे विस्कटल्याने एका गटाने अर्ज मागे घेत उपसरपंच निवडीतून माघार घेतली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी ग्रामसेवक एस. बी. मिसाळ यांनी प्रशांत पोतदार यांचा एकच अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची धामोड ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले. ‘लोकमत’ने धामोडच्या उपसरपंचपदी प्रशांत पोतदार यांचीच निवड होईल असे वृत्त दिले होते ते खरे ठरले.
नाट्यमय घडामोडीनंतर प्रशांत पोतदार यांची धामोडच्या उपसरपंचपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 4:47 AM