प्रकाश पाटील---कोपार्डे --करवीरच्या पश्चिमेला असणाऱ्या दुर्गम भागात तीन हजार लोकवस्तीच्या पासार्डे गावात ५१ लाख रुपये खर्चून पेयजल योजना झाली. मात्र, गावकारभाऱ्यांच्या अयोग्य नियोजन व निष्क्रिय कारभारामुळे या गावातील ग्रामस्थांना ऐन हिवाळ्यात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. गाव विहिरीतील अपुरा पाणीपुरवठा व वाढती लोकसंख्या यांचा मेळ बसेना म्हणून पेयजल मंजुरीसाठी गावाकडून प्रस्ताव दाखल करण्यात आला. पेयजल योजनेसाठी या गावाला ५१ लाखांचा निधी मंजूर झाला; पण या योजनेची निविदा देण्यापासून ती पूर्ण होऊन ग्रामपंचायतीच्या हातात सुपूर्द करेपर्यंतचा प्रकार वादग्रस्त होता. मागील वर्षीही पाणीटंचाईने हे चित्र समोर आले होते. या योजनेत म्हारूळ (ता. करवीर) येथील नदीकाठावर जॅकवेल बांधणे व तेथून पासार्डे गावापर्यंत नळपाणी पाईपलाईन असे बजेट यासाठी खर्ची पडले आहे. दोन आठवड्यांपूर्वी माजी आमदार पी. एन. पाटील यांच्या हस्ते या पेयजल योजनेचे घाईगडबडीत श्रेय लाटण्यासाठी उद्घाटन झाले; पण उद्घाटन झाल्यादिवशी एक दिवस कशीतरी सुरू केलेली पेयजल योजना गेला महिनाभर बंद असल्याने विलास जाधव यांच्या कूपनलिकेचाच ग्रामस्थांना पाण्यासाठी आधार ठरला. याबाबत ग्रामस्थांतून चौकशी केली असता आॅक्टोबर, नोव्हेंबर महिन्यांपर्यंत उपवडे धरणातील पाण्यामुळे गावविहिरीला पाणी होते. मात्र, येथेही १२ दिवस उपसाबंदी लावली असल्याने बोलोली येथे असणाऱ्या धरणातच पाणी बरगे घालून अडविल्याने गावविहिरीला पाझराचे पाणीच मिळेना. यामुळे गावविहीर कोरडी पडली आणि गावाला पेयजलची सोय असताना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे.पेयजलचे एक लाख रुपये वीजबिल थकीतपेयजलचे एक लाख ११ हजार रुपये वीज बिल थकीत असून, त्यापैकी ३० हजार रुपये भरून सध्या महावितरणने वीज कनेक्शन पुन्हा जोडले आहे. सध्याचे ग्रामपंचायतीचे उत्पन्न आणि पेयजलचे वीज बिल पाहता या गावाला ते पेलणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. पावसाळ्यात विजेचे खांब व सर्व्हिस लाईन तुटली होती. ती आता दुरुस्त केली असून, आजपासून पाणीपुरवठा सुरळीत होईल. - दीपा सुतार, सरपंचबोलोलीच्या धरणात पाणी अडविल्याने गेला महिनाभर पाणीटंचाईविलास मगदूम यांनी माणुसकी दाखवीत आपल्या कूपनलिकेतून केला गावाला पाणीपुरवठा
‘पेयजल’नंतर पासार्डे ग्रामस्थांचा घसा कोरडाच
By admin | Published: January 03, 2017 11:35 PM