कोल्हापूर : लाल माती गाजविणाऱ्या हिंदकेसरी व ज्येष्ठ मल्ल आणि त्यांच्या पश्चात पत्नींना मिळणारे मानधन राज्य शासनाच्या क्रीडा कार्यालयाकडे सोमवारी जमा झाले. बँकांच्या सुट्यांमुळे हे मानधन शनिवारनंतर संबंधित मल्लांच्या हाती पडणार आहे.गेले वर्षभर हिंदकेसरी व ज्येष्ठ खेळाडू आणि त्यांच्या पश्चात पत्नींना मिळणारे मानधन राज्य शासनाच्या क्रीडा कार्यालयाकडून थकले होते. राज्याचे क्रीडा सहसंचालक नरेंद्र सोपल यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या ज्येष्ठ मल्लांचे मानधन रखडले असून ते ३१ मार्चअखेर त्यांच्या खात्यावर जमा करू, अशी ग्वाही दिली होती. हिंदकेसरी व ज्येष्ठ मल्लांच्या थकलेल्या मानधनाबाबत ‘लोकमत’ने पाठपुरावा केल्यानंतर सर्वांचे मिळून ९ लाख १० हजार रुपये क्रीडा कार्यालयाच्या खात्यात जमा झाले. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या काळातील हे मानधन आहे. प्रत्येक मल्लाच्या बँक खात्यात क्रीडा खात्याकडे जमा झालेले मानधन सोमवारी रात्री उशिरा कोषागारकडून वर्ग करण्याचे काम सुरू होते. ज्येष्ठ मल्ल आणि त्यांच्या पश्चात पत्नींच्या नावे जमा झालेले मानधन असेनाव प्रति महिना एकूण १)स्वर्गीय पांडुरंग सुतार यांच्या पश्चात पत्नी भारती सुतार२५००३०,०००२)स्वर्गीय के. डी. माणगावे यांच्या पश्चात पत्नी सुनंदा माणगावे४०००४८,०००३)स्वर्गीय शिवाजी मोरे यांच्या पश्चात आक्काताई मोरे २५००३०,०००४)स्वर्गीय आनंदराव मोळे यांच्या पश्चात चंद्रकला मोळे ४०००४८,०००५)श्रीपती खंचनाळे६०००७२,०००६)दीनानाथसिंह नारायणसिंह६०००७२,०००७)दादू चौगुले६०००७२,०००८)महिपती केसरे२५००३०,०००९)गणपतराव आंदळकर६०००७२,०००१०)बंडू पाटील४०००४८०००११)विनोद चौगुले६०००७२,०००१२)रामचंद्र सारंग४०००४८,०००१३)रंगराव चव्हाण२५००३०,०००१४)संभाजी पाटील६०००७२,०००१५)नामदेव मोळे४०००४८,०००१६)विष्णू जोशीलकर६०००७२,०००
‘हिंदकेसरी’चे मानधन अखेर जमा
By admin | Published: March 31, 2015 12:07 AM