बुबनाळ : जयगड (जि. रत्नागिरी) येथील जेएसडब्लू जयगड पोर्ट लिमिटेड कंपनीत वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा जादा कोळसा माल भरला आणि उतरला जातो. ठराविक वाहनांना थ्रू पास दिल्याने अन्य वाहनधारकांवर अन्याय होत आहे. याबाबत शिरोळ एकता ट्रक मालक असोसिएशनच्यावतीने आंदोलनाचा इशारा दिला होता. याबाबत खासदार धैर्यशील माने यांनी कंपनीशी संपर्क साधून ओव्हरलोड कोळसा वाहतूक अंडरलोड करून दिली. याबद्दल एकता ट्रक मालक असोसिएशन व महालक्ष्मी ट्रक मालक असोसिएशनच्यावतीने धैर्यशील माने यांचे आभार मानण्यात आले.
जेएसडब्ल्यू जयगड पोर्ट लि., रत्नागिरीहून क्षमतेपेक्षा ज्यादा मालाची कोळसा वाहतूक करण्यासाठी ट्रकमालकांना कंपनीमार्फत सक्ती करण्यात येत होती. त्यामुळे रस्ते खराब होऊन अपघातांचे प्रमाण वाढत होते तसेच गाड्यांचेही नुकसान होत होते. या सर्व बाबींचा विचार करून खासदार माने यांनी कंपनीला ओव्हरलोड कोळसा वाहतूक अंडरलोड करून देण्याच्या सूचना केल्या. ही सूचना कंपनीने मान्य केल्याने शिरोळ येथील एकता ट्रक असोसिएशन व महालक्ष्मी ट्रक ओनर्स असोसिएशन यांनी आपले आंदोलन मागे घेतले आहे. याबाबत खासदार धैर्यशील माने यांचा असोसिएशनकडून सत्कार करण्यात आला. यावेळी आरिफ पटेल, अरविंद पाटील, आबीद पटेल, आदी उपस्थित होते.
फोटो - ०७०७२०२१-जेएवाय-०५
फोटो ओळ - शिरोळ तालुका एकता ट्रक असोसिएशनकडून खासदार धैर्यशील माने यांचा सत्कार करण्यात आला.