शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
2
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
3
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
4
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
5
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
6
Maharashtra Election 2024 Live Updates: 'लाडकी बहीण'सारख्या योजनांचे सरकारने नीट नियोजन केलं आहे- मुख्यमंत्री शिंदे
7
हमीभावाबाबत पंतप्रधान मोदींची महत्त्वाची घोषणा; राज्यातील हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा
8
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
9
Ola Electric CCPA Notice : Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
10
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
11
"एक माणूस म्हणून तो...", इब्राहिमसोबतच्या नात्यावर पलक तिवारीने केलं होतं भाष्य
12
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
13
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
14
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
15
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
16
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
17
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
18
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
20
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...

दबाव आणाल तर रोस्टरनंतरच ‘एनओसी’

By admin | Published: August 17, 2016 12:04 AM

गुरूजींनी मागितला ‘अल्टिमेटम’ : ‘सीईओं’नी दिली तराटणी; सेवाज्येष्ठता यादीनुसार संधी देण्याची ग्वाही

कोल्हापूर : रोस्टर पूर्ण होईपर्यंत सेवाज्येष्ठता यादीनुसार रिक्तपदी संधी देण्याचे धोरण ठरले असताना ढोल-ताशे वाजवून व उपोषण करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नका. कोणाकडे ‘अल्टिमेटम’ मागता, शिक्षक म्हणता मग शाळा सोडून असे वागणे शोभते का? समाजाला काय संदेश देता, अशाप्रकारे दबाव आणाल तर रोस्टर पूर्ण झाल्यानंतरच जिल्ह्यात या, अशा शब्दांत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी शिक्षकांच्या शिष्टमंडळाला तराटणी दिली. आंतरजिल्हा बदलीने येऊ इच्छिणाऱ्या शिक्षकांनी मंगळवारी जिल्हा परिषदेवर ढोल-ताशांचा गजर करत मोर्चा काढून दारात उपोषणास सुरुवात केली आहे. शिष्टमंडळ मागणीचे निवेदन घेऊन डॉ. खेमनार यांनी भेटण्यासाठी गेले. गेली वीस वर्षे जिल्ह्याबाहेर राहत आहे, सर्व प्रवर्गाच्या ५५७ जागा रिक्त आहेत, या प्रवर्गातील २४८ शिक्षक जिल्ह्णात येण्यास इच्छुक आहेत. जिल्हा परिषदेचे उंबरठे झिजवून कंटाळा असल्याचे सांगत ‘एनओसी’ कधी देता, आम्हाला अल्टिमेटम द्या, असे रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे सुनील पोवार यांनी सांगितले. त्यावर काहीसे संतप्त झालेले डॉ. खेमनार यांनी कपाळावरील भंडारा कसला, आंतरजिल्हा बदली किती वर्षांनी होते, बंदूक डोक्यावर ठेवून उपोषण व ढोल-ताशा कशासाठी वाजवता? अशी विचारणा करत असे आंदोलन करून शिक्षण विभागाला बदनाम करायचे आणि त्याच विभागात काम करायचे हे योग्य नाही. रोस्टर आल्याशिवाय बदलीची प्रक्रिया राबविता येत नाही तरीही सेवाज्येष्ठता यादीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्यावर हरकत घेऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाईल. लवकरात लवकर ही प्रक्रिया राबवत असताना पुन्हा रोस्टरमध्ये दोष राहू नये, याची दक्षता घ्यावी लागत असल्याचे डॉ. खेमनार यांनी सांगितले. बदल्यांबाबत उलटसुलट चर्चा आहे, पण कोणत्याही परिस्थितीत पारदर्शकच ही प्रक्रिया राबविली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. शरद अवघडी, सरदार कांबळे, शुभांगी कानिटकर, अर्चना माने, अर्चना लिमकर आदी उपस्थित होते.