शहरं
Join us  
Trending Stories
1
न भूतो, न भविष्यती...! जितेंद्र आव्हाडांकडून एकनाथ शिंदेंची स्तुती; म्हणाले, शिंदेंनी मला मदत केली...
2
३० वर्षांनी मतदानाच्या टक्केवारीत वाढ; सरकार बदलणार की तेच राहणार? इतिहास काय सांगतो
3
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
4
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
5
कार्यकर्त्यांना वाटतं फडणवीस यांनीच CM व्हावं, पण...; मुख्यमंत्रीपदासंदर्भात बावनकुळेंचं सूचक विधान
6
Ration Card धारकांसाठी मोठी बातमी! ५.८ कोटी शिधापत्रिका होणार रद्द; तुमचं नाव तर यात नाही ना?
7
'या' ५१ जागा ठरवणार खरी शिवसेना कुणाची; एकनाथ शिंदे उद्धव ठाकरेंपेक्षा वरचढ ठरणार?
8
अमिताभ बच्चन यांचा ब्लॉग चर्चेत, म्हणाले, "मी माझ्या कुटुंबाविषयी क्वचितच बोलतो कारण..."
9
'खलनायक'मधील साँगसह Yashasvi Jaiswal साठी आला टीम इंडियासाठी 'नायक' होण्याचा संदेश
10
शिंदेंची खुर्ची जाणार, फडणवीसांचा राजयोग...; चित्रकूट धामच्या आचार्यांचे महाराष्ट्र विधानसभा निकालावर मोठे भाकीत
11
महाराष्ट्राची निवडणूक संपत नाही तोच दिल्लीत तयारी सुरु झाली; आपची पहिली यादी आली
12
Reliance JIO-BP चा पेट्रोल पंप डीलर बनण्याची संधी, जाणून घ्या काय काय करावं लागेल?
13
राज्यातील २३ मतदारसंघ... ज्यांच्यावर २३ नोव्हेंबरला असेल अख्ख्या महाराष्ट्राची नजर; उलथापालथ होणार?
14
‘लोकल’ बंद न ठेवता ‘त्यांनी’ केले मतदान;  रेल्वे प्रशासनाची प्रशंसनीय व्यवस्था
15
४ ग्रहांचे गोचर: ७ राशींना डिसेंबर करेल मालामाल, अनेक लाभ; उत्तम नफा, पद-पैसा-ऐश्वर्य काळ!
16
IAS ची पत्नी असल्याचं खोटं सांगून कोट्यवधींची फसवणूक; किटी पार्टीच्या नावाखाली महिलांना गंडा
17
बायोडिझेल तयार करणाऱ्या कंपनीचा येणार IPO; आतापासूनच GMP मध्ये तुफान तेजी
18
भारीच! 'या' २५ मतदारसंघांमध्ये झालं ७५ टक्क्यांहून अधिक मतदान; ८४.७९ टक्केवाला 'टॉपर'
19
"सगळं ओक्केमध्ये असेल तर..." कॅप्टन बुमराहचं सहकारी शमीसंदर्भात मोठं वक्तव्य
20
पश्चिम रेल्वेवर नवी एसी लोकल दाखल;आठवडाभर टेस्टिंग; प्रवाशांना दिलासा

लाटकरांना गुलाल, ऋतुराज पाटील खांद्यावर; मतदानानंतर दक्षिण, उत्तरमधील कार्यकर्त्यांचा जोश 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2024 2:10 PM

कोल्हापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर दक्षिण व कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, ...

कोल्हापूर : अत्यंत प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर दक्षिणकोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघात मतदान झाल्यानंतर काँग्रेससह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी धैयप्रसाद हॉल येथे एकत्र येत आमदार ऋतुराज पाटील यांना खांद्यावर घेत त्यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या, तर उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांना निकालाआधीच गुलाल लावत कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.विधानसभा निवडणुकीत काँग्रेससह महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील व राजेश लाटकर यांच्यासाठी कार्यकर्ते मोठ्या नेटाने राबले. मतदान झाल्यानंतर काँग्रेसचे विधान परिषदेचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी बुधवारी या दोन्ही मतदारसंघांतील कार्यकर्त्यांचे धैर्यप्रसाद हॉल येथे आभार मानले. यावेळी सतेज पाटील यांच्यासह दोन्ही उमेदवारांची भेट घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.दक्षिण व उत्तर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या मतदान याद्यांची प्रक्रिया धैर्यप्रसाद हॉल येथून पार पाडली जात होती. त्यामुळे मतदान झाल्यानंतर महाविकास आघाडीचे कार्यकर्ते धैयप्रसाद हॉल येथे जमले. सतेज पाटील यांनी त्यांच्याकडून गावांमध्ये, प्रभागांमध्ये किती मतदान झाले याचा आढावा घेत निवडणुकीतील सहकार्याबद्दल आभार मानले. दक्षिणचे उमेदवार आमदार ऋतुराज पाटील, उत्तरचे उमेदवार राजेश लाटकर यांनीही कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे आभार मानत त्यांच्याकडून आढावा घेतला. यावेळी आमदार जयंत आसगावकर, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.

सेल्फीसाठी झुंबडधैर्यप्रसाद हॉल येथे दक्षिणमधील शहर, उपनगर व ग्रामीण भागातील कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात होते. आमदार सतेज पाटील, आमदार ऋतुराज पाटील यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी तरुणांनी मोठी गर्दी केली होती.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरkolhapur-south-acकोल्हापूर दक्षिणcongressकाँग्रेसwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024