चंदगड : ग्रामीण भागातील शेतीला सक्षम जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटनाचा सध्या मोठ्या प्रमाणात विकास होत आहे. त्यातून शेतीपूरक व्यवसाय व रोजगार उपलब्ध होत असून, ते शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत, असे मत कृषी पर्यटन विभागाचे व्यवस्थापक बाळासाहेब सोळांकुरे-पाटील यांनी व्यक्त केले.
सुंडी (ता. चंदगड) येथे महाराष्ट्र शासन कृषी विभाग, कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) कोल्हापूर व तालुका कृषी अधिकारी चंदगड व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे (महाराष्ट्र शासन अंगीकृत) यांच्यातर्फे शेतकरी प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच गणपत-पवार (मांडेदुर्ग) होते.
‘आत्मा’चे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिजित दावणे यांनी प्रास्ताविक केले. शेतकऱ्यांना कृषी पर्यटन व कृषी पर्यटनाचा विकास कसा करायचा. त्यातून व्यवसाय कोणत्या पद्धतीने करायचा आणि कृषी पर्यटनाचे फायदे याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
यावेळी खन्नूरकर, मोहन परब, भावकू गुरव, दिग्विजय खवणेवाडकर, सुबराव पाटील, यादू पाटील, भरमू पाटील, बाळू पाटील, नाना डसके, संदीप पाटील उपस्थित होते. संजय पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एन. एम. पाटील यांनी आभार मानले.
-------------------------
फोटो ओळी : सुंडी (ता. चंदगड) येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात बाळासाहेब सोळाकुंरे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.
क्रमांक : ०७०३२०२१-गड-०४