नसिम सनदी ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरणाला चालना देण्याच्या उद्देशाने सुरू झालेल्या कृषी यांत्रिकीकरण योजनेला भरीव निधी देण्याची शासनाची घोषणाही फसवी ठरली आहे. शासनस्तरावरील निधीच्या दुष्काळाची झळ यादेखील योजनेला बसली असून, एकट्या कोल्हापूर जिल्ह्यात २0 कोटी रुपयांच्या मागणीच्या तुलनेत वर्षभरात अवघे पाच कोटी मिळाले आहेत. त्यातील तीन कोटी ६0 लाख रुपयेच अनुदानाच्या स्वरूपात वाटले आहेत. निधीच नसल्याने जिल्ह्यातील तब्बल सहा हजार ७९७ शेतकरी अनुदानाच्या प्रतीक्षेत आहेत.मजुरांच्या टंचाईमुळे शेतकरी झपाट्याने यांत्रिकतेकडे वळला आहे. ३५ ते ५0 टक्के अनुदानावर ट्रॅक्टर, पॉवरटीलरसारखी शेतीची मशागत सुलभ करणारी औजारे मिळवून देणारी यांत्रिकीकरण योजना शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहे; पण नेहमीप्रमाणे शासनाच्या उदासीन धोरणाचा फटका शेतकºयांना बसू लागला आहे. यावर्षी जिल्ह्यातील १३ हजारांहून अधिक शेतकºयांनी यंत्रासाठी आॅनलाईन अर्जाद्वारे मागणी नोंदविली होती. त्यापैकी सात हजार २४७ लाभार्थी निश्चित करण्यात आले आहेत. यात अनुसूचित व खुला असे दोन प्रवर्ग करून त्याप्रमाणे अनुदानाची मागणी करण्यात आली. अर्ज करणाºयांची संख्या जास्त असल्याने त्यासाठी ६४ कोटी रुपये लागतील, असा अंदाज गृहीत धरून मागणी नोंदविण्यात आली. तथापि, शासनाकडून फेरअंदाजाची मागणी आल्यानंतर ती निम्म्याने कमी करून २0 कोटींवर आली. त्यापैकी पाच कोटी ९५ लाख ४१ हजार रुपये प्राप्त झाले आहेत. त्यातही केवळ तीन कोटी ६0 लाख इतकीच रक्कम आतापर्यंत खर्च झाली आहे. यातून ४५0 लाभार्थ्यांना अनुदान दिले आहे.सहा हजार ७९७ प्रस्तावांना पूर्वसंमतीजिल्ह्यातील आॅनलाईन अर्ज केलेल्यांमध्ये सहा हजार ७९७ शेतकºयांच्या प्रस्तावांना पूर्वसंमती देण्यात आली आहे. त्यात अनुसूचित प्रवर्गातील ३९५, तर खुल्या प्रवर्गातील सहा हजार ४0२ प्रस्तावांचा समावेश आहे. यांची मोका तपासणी झाल्यानंतर त्यांना अनुदान मिळणे अपेक्षित होते. तथापि, शासनाकडून निधीच येत नसल्याने हे प्रस्तावही अडकून पडले आहेत.
कृषी यांत्रिकीकरणास मिळाले अवघे पाच कोटी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 12:57 AM