शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

‘फादर’नी वीट ठेवली अन् जळीतग्रस्तांची ५ घरे उभारली, बारा वर्षापूर्वीची गडहिंग्लज येथील हृदयस्पर्शी आठवण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2024 5:47 PM

फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याहस्ते जळीतग्रस्त घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्यात आली अन् गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिप्पूर येथील पारळेवाडीतील ५ जळीतग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटूंबांना जगण्याची उमेद आणि हक्काचा निवारा पुन्हा मिळाला.

राम मगदूमगडहिंग्लज : बारा वर्षांपूर्वीची गोष्ट. प्रख्यात ख्रिस्ती धर्मगुरू, लढवय्ये पर्यावरणवादी कार्यकर्ते, संवेदनशील लेखक फादर फ्रान्सिस दिब्रेटो यांच्याहस्ते जळीतग्रस्त घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्यात आली अन् गडहिंग्लज तालुक्यातील दगडी शिप्पूर येथील पारळेवाडीतील ५ जळीतग्रस्त अल्पभूधारक शेतकरी कुटूंबांना जगण्याची उमेद आणि हक्काचा निवारा पुन्हा मिळाला.हकीकत अशी, डिसेंबर २०१२ मध्ये शिप्पूर तर्फ आजरा (ता. गडहिंग्लज, जि. कोल्हापूर) येथील पारळेवाडीत एक दुर्घटना घडली. दिनकर, तुकाराम, श्रीकांत, सदाशिव व दत्तू या ५ सख्या भावांची दगडामातीची कौलारू घरे एकमेकांना लागून होती.जनावरांच्या गोठ्यात डासांसाठी घातलेल्या धुमीची आग मध्यरात्री स्वयंपाक घरापर्यंत पोहोचली. त्यामुळे सिलेंडरचा स्फोट होवून पाचही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. छप्पर, दारे, खिडक्या आणि घरातील प्रापंचिक साहित्यासह पैसा-अडकाही जळून खाक झाला. केवळ दैव बलवत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही.शेती व शेतमजुरीवरच गुजराण करणारी  पाचही कुटूंबे उघड्यावर पडली. ‘लोकमत’ने समाजातील दानशूरांना जळीतग्रस्तांच्या मदतीसाठी हाक दिली. त्यामुळे अनेकांनी उत्स्फूर्तपणे रोकड आणि वस्तुरूपाने मदत केली.दरम्यान, येथील साधना हायस्कूलच्या सुवर्णमहोत्सवासाठी प्रमुख पाहुणे म्हणून फादर दिब्रेटो गडहिंग्लजला आले होते. त्यांच्याहस्तेच पारळेवाडीतील जळालेल्या घरांच्या पुर्नबांधणीची वीट ठेवण्याचा निर्णय कार्यकर्त्यांनी घेतला. ‘फादर’नीही ती आनंदाने मान्य केली. नियोजित कार्यक्रमानंतर त्यांनी थेट पारळेवाडीला भेट दिली. त्यावेळी माजी आमदार श्रीपतराव शिंदे, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्रा. विठ्ठल बन्ने, सुरेश शिपूरकर,उद्योगपती पी.पी.बारदेस्कर,चंदुभाई जोशी, प्राचार्य जे.बी.बारदेस्कर,तत्कालिन प्रांताधिकारी विवेक आगवणे, डीवायएसपी अशोक भरते, तहसिलदार अनिल कारंडे, प्राचार्य तुकाराम चव्हाण, प्राचार्य डॉ .शिवाजीराव रायकर,बचाराम काटे,प्रा.शिवाजीराव होडगे,उज्वला दळवी,सुवर्णलता गोईलकर, अलका भोईटे,प्रा.अनुराधा मगदूम आदी उपस्थित होते.खुद्द ‘फादर’नीही केली होती मदत..!जळीतग्रस्तांच्या घरकुल पुर्नबांधणीची वीट ठेवल्यानंतर फादर दिब्रेटो यांनी आपल्या खिशातून काढलेली मूठ एका कार्यकर्त्याच्या हातात सोडली. म्हणाले, 'तुमच्या लाखमोलाच्या कामात माझादेखील खारीचा वाटा. परंतु, त्याबद्दल कुणालाही सांगायचे नाही. आचार-विचारातून मानवता धर्माची शिकवण देणाऱ्या सच्चा ‘धर्मगुरू'च्याहस्ते सुरू झालेले काम अल्पावधीतच पूर्णत्वाला गेले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूर