शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

राज्यातील प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस: हसन मुश्रीफ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2020 8:33 PM

राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत.

- दत्ता पाटीलकोल्हापूर (म्हाकवे):  राज्यात खासगी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळा विविध योजना राबवून प्राथमिक शाळांसमोर आव्हाने उभी करत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अनेक प्राथमिक शाळांची पडझड झाली असून, दुरवस्था होतेय. त्यामुळे राज्यातील पहिल्यांदा केंद्रीय शाळा त्यानंतर सर्वच प्राथमिक शाळा आरसीसी करण्याचा मानस आहे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. शिक्षकांनीही अंतर्मुख होऊन या शाळा वाचविण्यासाठी शिक्षणाचा दर्जा सुधारावा, असे आवाहनही त्यांनी केले. शेंडूर(ता.कागल)येथील प्राथमिक शाळेच्या शतक महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते.आपण शिक्षणमंत्री असताना सेमी इंग्रजी सुरू केले होते, असे सांगत ना. मुश्रीफ म्हणाले. राज्यात ६५ हजार ३२४ प्राथमिक शाळा असून यामध्ये अडीच लाखांहून अधिक शिक्षक ज्ञानदानाचे काम करत आहेत. मात्र,अनेक शाळांच्या इमारतींची पडझड झाली आहे. कौले फुटलेली असतात. त्यामुळे या शाळांचा लूक बदलणे गरजेचे आहे. दरम्यान, प्राथमिक शाळा या सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचे प्रवेशद्वार आहे. त्या टिकविण्याची जबाबदारी पालक, शिक्षक, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी एकसंधपणे उचलली पाहिजे, असे मतही ना. मुश्रीफ यांनी व्यक्त केले.

ग्रामविकास खाते 'पथदर्शी' बनवूः मुश्रीफग्रामविकास मंत्रिपदाच्या काळात दिवगंत आर. आर. पाटील यांनी ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव ही महत्त्वाकांक्षी अभियानाने राबवून ग्रामविकास खाते गतिमान केले. त्यांच्या आदर्श पायवाटेवरून मार्गक्रमण करून विविध योजनांच्या माध्यमातून हे खाते 'पथदर्शी'बनवू, असा विश्वासही ना. मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केला.