कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील वाकिघोलपैकी तोरस्करवाडी येथील इयत्ता सहावीत शिकणाऱ्या राहुल तोरस्कर या मुलाच्या मेंदूला इन्फेक्शन झाले असून, त्याच्या उपचारांसाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे. आईवडील शेतमजूर असल्याने त्यांना हा खर्च झेपणारा नाही. तरी नागरिकांनी आपल्या परीने शक्य तितकी मदत करावी अशी हाक त्याचे वडील संदीप तोरस्कर यांनी दिली आहे.राहुलच्या घरची परिस्थिती बेताची असल्याने आई-वडील दुसऱ्याच्या शेतात मजुरीसाठी जातात. त्याला एक लहान बहीणदेखील आहे. राहुल महालक्ष्मी माध्यमिक विद्यालय, आङोली येथे शिकत आहे.
काही दिवसांपूर्वी त्याला ताप आला आणि तो वाढत जाऊन मेंदूला इन्फेक्शन झाले आहे. त्याच्यावर खासगी दवाखान्यात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून त्यासाठी अडीच लाख रुपये खर्च येणार आहे.
मुख्यमंत्री साहाय्यता निधीसाठी मागणी केली असली तरी तो कोरोनाकङे वळवल्याने मिळणे शक्य नाही. तरी समाजातील दानशूर व्यक्तींनी त्याचे चुलते मधुकर तोरस्कर यांच्या खात्यावर शक्य तितकी रक्कम जमा करावी, अशी हाक त्याच्या वडिलांनी दिली आहे.
- बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा कडगाव
- खाते क्रमांक : २५०३२७८२१७७
- आयएफएससी कोड : MAHB0000७४९