शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
2
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
3
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
4
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
5
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
6
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
8
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
9
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
10
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
11
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
12
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
13
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
14
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
15
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
16
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
17
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
19
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
20
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला

किरीट सोमय्या यांचा शिवसेनेवर निशाणा : विश्वासघाताचे उत्तर द्यावेच लागेल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 02, 2019 2:47 PM

राज्य व देशातील अनेक प्रश्नांवर लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविली; पण विधानसभेचा निकाल हाती येताच केवळ सत्तेसाठी टोकाचा विरोध असणाऱ्यांसोबत गेले. या मंडळींनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा विश्वासघात केला असून, त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, अशा शब्दांत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.

ठळक मुद्देविश्वासघाताचे उत्तर महाराष्ट्राच्या जनतेला द्यावेच लागेल  सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर अंकुश ठेवा

कोल्हापूर : राज्य व देशातील अनेक प्रश्नांवर लोकसभा व विधानसभेची निवडणूक एकत्रितपणे लढविली; पण विधानसभेचा निकाल हाती येताच केवळ सत्तेसाठी टोकाचा विरोध असणाऱ्यांसोबत गेले. या मंडळींनी महाराष्ट्राच्या सामान्य माणसाचा विश्वासघात केला असून, त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल, अशा शब्दांत भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवसेनेवर निशाणा साधला.किरीट सोमय्या कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. त्यांनी सकाळी अंबाबाईचे दर्शन घेतल्यानंतर भाजपच्या शहर कार्यालयात प्रमुख पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. किरीट सोमय्या म्हणाले, आपल्या मित्रपक्षाने भाजपच्या निर्मितीपासून अजेंठ्यावर असणारे काश्मीरचा प्रश्न, ३७० कलम, राज जन्मभूमी, समान नागरी कायदा अशा अनेक प्रश्नांवर एकत्रित निवडणुका लढविल्या; पण केवळ सत्तेसाठी पारंपरिक विरोधकांसोबत गेले.

आता भाजपच्या कार्यकर्त्यांची जबाबदारी वाढली आहे. आगामी काळात अतिशय दक्षतेने कार्यरत राहावेच लागेल. सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर लक्ष ठेवून जनतेच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर होतो का? यावर अंकुश ठेवा.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, पक्षाचे महानगर जिल्हाध्यक्ष राहुल चिकोडे, सरचिटणीस अशोक देसाई, आर. डी. पाटील, अ‍ॅड. संपत पवार, दिलीप मेत्राणी, सुभाष रामुगडे, अजित ठाणेकर, विजय खाडे, मारुती भागोजी, हेमंत आराध्ये, सुरेश जरग, आदी उपस्थित होते. विजय जाधव यांनी आभार मानले.दगा देणाऱ्यांना धडा शिकविणार!मित्र पक्षांसाठी आपणास लोकसभेच्या उमेदवारीचा त्याग करावा लागला. त्यांनीच संधी साधून दगा दिला. अशांना धडा शिकविण्यासाठी आपण मैदानात उतरल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी यावेळी दिला.

 

 

टॅग्स :BJPभाजपाkolhapurकोल्हापूर