गारगोटी : गारगोटी कोविड सेंटरला आजी-माजी पतसंस्थेने सामाजिक बांधिलकी जपत २५ हजारांची वैद्यकीय मदत केली.
या मदतीमध्ये आवश्यक असणारी इंजेक्शन, औषधे, गोळ्यांचा समावेश होता. भुदरगडच्या तहसीलदार अश्विनी अडसूळ यांच्या प्रमुख उपस्थितीत कोविड सेंटरचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मिलिंद कदम, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यत्नाळकर यांनी ही वैद्यकीय मदत स्वीकारली. या वेळी तहसीलदार अडसूळ यांनी संस्थेच्या कार्याचे कौतुक केले. या वेळी भुदरगड तालुक्याच्या माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव मेंगाणे, प्रशासन कक्षाधिकारी कांचन भोईटे, पतसंस्थेचे व्यवस्थापक किरण भोईटे, संचालक बाळासो पाटील, दत्ता साळवी, सेवक संजय साळवी, साताप्पा सांडुगडे, विनोद राणे आदर उपस्थित होते.
०५ गारगोटी आजीमाजी संस्था
फोटो ओळ
गारगोटी कोविड सेंटरला मदत देताना नारायण देसाई, किरण भोईटे, कांचन भोईटे, सर्जेराव मेंगाने आदी.