शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 04:19 PM2019-01-28T16:19:00+5:302019-01-28T16:20:25+5:30

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

Ajit Pawar to quit BJP for making farmers poor, NCP: Ajit Pawar | शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

Next
ठळक मुद्देशेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवारमुदाळ येथे राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत आवाहन

सरवडे/कोल्हापूर : शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.

अजित पवार पुढे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ऊसाची शेती हा धंदा आहे. भाजपाच्या मंत्री यांचे कारखाने आहेत मग एकरकमी एफआरपी नाही. मी मंत्री असताना तात्काळ निर्णय केला, आता का नाही. सहवीज प्रकल्प विज खरेदी दर ६ होता तो हे सरकार ४ रुपये करण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात साखर पाठवत नाही. शेतकºयांची नाडी ओळखणारा प्रतिनिधी पाठवा.

महिलांवर अत्याचार होतो आहे. पोलिसांच्या खात्यातील महिलेवरच अत्याचार होत आहे. इंदिरा गांधी, प्रियंका गांधी कोण आहेत, हे जनतेला माहिती आहेत, मात्र त्यांचे गोत्र काढून नाहक दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.

स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, त्यांना शेकडो, कोटी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र ते बधले नाहीत. मात्र, या भाजपने ही बंदी उठवली, हा आमच्या तरुणांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे.
आम्ही कारखानदारी आणली. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. कामगार, शेतकरी, महिला, तरुण या सरकारवर नाराज आहेत. सर्व घटकांचा भ्रमनिरास झाल्याने जनता भाजपची धुलाई करणार आहे हा विश्वास आहे.

आम्ही जीएसटी १२ टक्के आणणार होतो यांनी २८ टक्के लादली. शिक्षित तरुण, तरुणीना नोकरी नाही.५४ वर्षात जेवढे कर्जे नव्हते तेवढे साडेचार वर्षात केले. जाहिरातीवर मात्र ५४ टक्के खर्च केला. हे सरकार राज्याला कंगाल बनवत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

Web Title: Ajit Pawar to quit BJP for making farmers poor, NCP: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.