शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 4:19 PM

शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, राष्ट्रवादीला साथ द्या : अजित पवारमुदाळ येथे राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत आवाहन

सरवडे/कोल्हापूर : शेतकऱ्यांना कंगाल बनविणाऱ्या भाजपला सोडा, त्यांच्यामुळे शेतकऱ्यांचे गणित बिघडले आहे, ते दुरुस्त करण्यासाठी, रोजगार उपलब्ध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला साथ द्या, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.भुदरगड तालुक्यातील मुदाळ येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्यव्यापी परिवर्तन निर्धार यात्रेत ते बोलत होते. यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष ए. वाय. पाटील, आदी उपस्थित होते.अजित पवार पुढे म्हणाले, हे सरकार शेतकरी विरोधी आहे. ऊसाची शेती हा धंदा आहे. भाजपाच्या मंत्री यांचे कारखाने आहेत मग एकरकमी एफआरपी नाही. मी मंत्री असताना तात्काळ निर्णय केला, आता का नाही. सहवीज प्रकल्प विज खरेदी दर ६ होता तो हे सरकार ४ रुपये करण्याच्या प्रयत्नात आहे. परदेशात साखर पाठवत नाही. शेतकºयांची नाडी ओळखणारा प्रतिनिधी पाठवा.महिलांवर अत्याचार होतो आहे. पोलिसांच्या खात्यातील महिलेवरच अत्याचार होत आहे. इंदिरा गांधी, प्रियंका गांधी कोण आहेत, हे जनतेला माहिती आहेत, मात्र त्यांचे गोत्र काढून नाहक दिशाभूल केली जात आहे, असा आरोपही अजित पवार यांनी यावेळी केला.स्वर्गीय आर. आर. पाटील यांनी डान्सबार बंद केले, त्यांना शेकडो, कोटी रुपयांची आमिषे दाखवली. मात्र ते बधले नाहीत. मात्र, या भाजपने ही बंदी उठवली, हा आमच्या तरुणांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न ह सरकार करत आहे.आम्ही कारखानदारी आणली. तरुणांना रोजगार देण्यासाठी प्रयत्न केला. कामगार, शेतकरी, महिला, तरुण या सरकारवर नाराज आहेत. सर्व घटकांचा भ्रमनिरास झाल्याने जनता भाजपची धुलाई करणार आहे हा विश्वास आहे.आम्ही जीएसटी १२ टक्के आणणार होतो यांनी २८ टक्के लादली. शिक्षित तरुण, तरुणीना नोकरी नाही.५४ वर्षात जेवढे कर्जे नव्हते तेवढे साडेचार वर्षात केले. जाहिरातीवर मात्र ५४ टक्के खर्च केला. हे सरकार राज्याला कंगाल बनवत आहे, अशी टीका पवार यांनी केली.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसkolhapurकोल्हापूर