मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 17, 2018 03:06 PM2018-12-17T15:06:42+5:302018-12-17T16:27:43+5:30

शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दल सरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

Ajit Pawar resigns in government's mind about Maratha reservation: Ajit Pawar | मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय : अजित पवार

googlenewsNext
ठळक मुद्दे'मराठा आरक्षणाविषयी शासनाच्याच मनात पाल चुकचुकतेय' 'न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू म्हणणारे शासनच द्विधावस्थेत''धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे'

कोल्हापूर /इचलकरंजी : शासनाने दिलेल्या मराठा आरक्षणाबद्दलसरकारच्या मनातच पाल चुकचुकते आहे. त्यामुळे न्यायालयात निष्णांत वकिलांची फौज उभी करू, असे सरकारमधीलच काही मंत्री सांगत आहेत, असे प्रतिपादन माजी मंत्री अजित पवार यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केले.

केंद्रात आणि राज्यात भाजपाचेच सरकार आहे. त्यामुळे मराठा आरक्षण कायमपणे टिकले पाहिजे, असा मसुदा करणे राज्य शासनाकडून अपेक्षित आहे. राज्यात लाखोंचे मोर्चे निघाल्यानंतर आम्हा सर्वांच्या एकमुखी पाठिंब्यावर शासनाने मराठा समाजाला एसईबीसी हे आरक्षण घोषित केले.

ते टिकविण्याचे शासनानेच काम आहे, असे सांगून पवार पुढे म्हणाले, ५२ टक्के आरक्षणाला धक्का न पोहचता शासनाने आता धनगर, लिंगायत आणि मुस्लिम समाजालाही आरक्षण दिले पाहिजे.

...मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल  : अजित पवार

काळजी करू नका, योग्य चिन्हांचे बटण दाबा मग भाजपच ईव्हीएम बदला असे म्हणेल, माझा ईव्हीएम मशीनवर विश्वास आहे, कर्नाटक , पंजाब आणि पाच राज्यांचे निकाल याच मशीनमधून आल्याचे माजी उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार म्हणाले. 

अजित पवार हे इचलकरंजी येथील  बालाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमाला आले होते, या समारंभात पवार यानी सरकारवर चौफेर टीका केली. सध्याचे सरकार शेतकरी विरोधात आहे, अशी टीका करून निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला राम, हनुमान आठवतो, असे पवार म्हणाले. 

मुख्यमंत्री, महसूल मंत्री, वस्त्रउद्योग मंत्री नुसता फसव्या घोषणा करतात. कसलीही कृती त्यांच्याकडून होत नाही, राज्यातील वस्त्रउद्योग धंद्याची या सरकारने वाट लावली आहे. केंद्रातले सरकार व राज्यातले सरकार हे फसवे आहे, असाही आरोप पवार यांनी केला.

काँगेसचे माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, राष्ट्रवादीचे आमदार हसन मुश्रीफ, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष राजेंद्र पाटील यद्रावकर, उदय लोखंडे उपस्थित होते.

Web Title: Ajit Pawar resigns in government's mind about Maratha reservation: Ajit Pawar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.