शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

...तर पवारांची अौलाद सांगणार नाही - अजित पवार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2018 5:00 PM

साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे

कोल्हापूर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल यात्रा सध्या पश्चिम महाराष्ट्रात सुरु आहे. आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी अजित पवार यांनी शिवसेना आणि भाजपावर टीका केली.  लोकसभा-विधानसभा काही महिन्यावर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे महाराष्ट्रातून जास्तीत जास्त खासदार आणि आमदार निवडून द्या. सोडवण्यासारखे तुमचे सर्व प्रश्न आम्ही सोडवू, जर तुमचे प्रश्न सोडवले नाही तर पवारांची अौलाद सांगणार नाही असे वक्तव्य अजित पवार यांनी येथील सभेत केले. 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या हल्लाबोल आंदोलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात गडहिंग्लज तालुक्यातील नेसरी  येथील जाहीर सभेने झाली.  या सभेत अजित पवार यांनी भाजपसोबत सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेवर जोरदार टीका केली. पवार यांनी आपल्या भाषणामध्ये  शिवसेनेच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. साडेतीन वर्ष भाजप आणि शिवसेना यांचा भोंगळ कारभार सुरु आहे. भाजप आणि शिवसेना ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, अशी खरमरीत टीका अजित पवार यांनी केली. 

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आयोजित हल्लाबोल आंदोलनाच्या पश्चिम महाराष्ट्रातील सभेत ते बोलत होते. पवार म्हणाले, देशात व राज्यात ‘अच्छे दिन’ आणतो म्हणून सत्तेत आलेल्या या भाजपने काय केले, याचे उत्तर द्यावे. कोणताही प्रश्न उपस्थित केला तर समिती नेमतो, अभ्यास करतो हे मुख्यमंत्री व संबंधित मंत्री यांचे उत्तर ठरलेले आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकातील छत्रपतींच्या पुतळ्याची उंची कमी करून चबुतऱ्यांची उंची वाढविण्याचे काम या सरकारने केले, असा आरोप त्यांनी केला. 

हे तर ‘बाई’ला नाचविणारे सरकारआम्हालाही गाय प्रिय आहे त्याबाबत कायदा केला. आम्हाला वाईट नाही वाटले; पण हजारो कुटुंबांचा विचार करून आम्ही ‘डान्स बार बंदी’चा घेतलेला निर्णय या सरकारने उलथवून पुन्हा ‘डान्स बार’ला परवानगी दिली. गायीला वाचविणारे व पुन्हा बाईला नाचविणारे हे सरकार ‘लोकहितवादी’ आहे का, असा टोला अजित पवार यांनी लगावताच जोरदार टाळ्या पडल्या. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना