सोमवारी संध्याकाळपर्यंत अजित पवार यांचा दौरा निश्चित नव्हता. त्यामुळे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे मुंबईला विमानाने जाण्यासाठी बेळगावला पोहोचले. त्यांना सोडून त्यांचे स्वीय सहायक मुन्ना हे वाहनांच्या ताफ्यासह कागलकडे परत येत होते. एवढयात पवार यांचा दौरा निश्चित झाल्याचा त्यांना निरोप आला. परत सर्वजण बेळगावला गेले. तोपर्यंत विमान आले नसल्याने मुश्रीफ बेळगावहून रात्री पुन्हा कागलमध्ये आले.
चौकट
बैठक सुरू झाल्यानंतर आले अधिकारी
अजित पवार यांच्या दौऱ्यामध्ये शासकीय विश्रामगृहावर ११ वाजता आढावा बैठक, असे नमूद करण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात पवार यांनी वेगाने पाहणी करत सव्वादहा वाजताच बैठक सुरू केली. त्यामुळे पावणेअकरापर्यंत विविध विभागांचे अधिकारी विश्रामगृहावर येतच असल्याचे चित्र पाहावयास मिळत होते.
चौकट
आमदारांना निरोपच नाही
अजित पवार यांच्या या बैठकीचा निरोप काही आमदारांना मिळाला नसल्याचे यावेळी स्पष्ट झाले. त्यामुळे आमदारही या बैठकीला उशिरा आल्याचे चित्रही यावेळी पाहावयास मिळाले. शासकीय दौऱ्यात ११ वाजता बैठक म्हटल्यानंतर अनेक आमदारही पावणेअकराच्यासुमारास दाखल झाले.