अजित पवार यांच्या आढावा बैठकीला सुरुवात; ओळखपत्र शिवाय कोणालाही आत प्रवेश नाही
By समीर देशपांडे | Published: January 29, 2024 10:14 AM2024-01-29T10:14:41+5:302024-01-29T10:14:59+5:30
पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून शासकीय ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते.
कोल्हापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कोल्हापूर येथील प्रशासकीय आढावा बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील महाराणी ताराराणी सभागृहात सुरुवात झाली आहे. दहा वाजता बैठक असताना पाच मिनिटे आधीच अजित पवार आल्यामुळे अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली. पोलिसांनी यावेळी कडक सुरक्षा व्यवस्था ठेवली असून शासकीय ओळखपत्र असल्याशिवाय कोणालाही आत सोडण्यात येत नव्हते.
आज या आढावा बैठकीमध्ये प्रामुख्याने अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा, जोतिबा विकास आराखडा यासह पंचगंगा प्रदूषण निर्मूलन आराखड्यावर अधिक चर्चा होण्याची शक्यता असून कदाचित अजित पवार हे कोल्हापूरसाठी मोठी घोषणा करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. तत्पूर्वी पवार यांनी शासकीय विश्रामगृहावर प्रमुख कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. आज पवार यांचा कोल्हापूर जिल्ह्याचा भरगच्च दौरा असून भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांच्या भीमा कृषी प्रदर्शनाचा समारोप त्यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे. यामुळे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साही वातावरण असल्याचे दिसून येते.