आजरा तालुक्यातील ३२ गावांमध्ये घनसाळ भाताचे उत्पादन घेतले आहे. १५० ते १६० शेतकरी सेंद्रिय पद्धतीने आजरा घनसाळचे उत्पादन घेतात. गेल्यावर्षी २०० एकर क्षेत्रावर घनसाळचे तर १० ते १२ एकरावर काळाजिरग्याचे उत्पादन घेतले होते.
चालू वर्षी आजरा घनसाळचे क्षेत्र वाढले असून ५०० एकरावर उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट आहे. काळा जिरगा २० एकरावर घेण्यासंदर्भात नियोजन केले आहे.
तालुक्यातील घनसाळ भाताचे उत्पादन घेण्यासाठी परवाना घेतलेल्या शेतकऱ्यांना आजरा घनसाळचे बियाणे ८० रुपये किलोने तर विना परवानाधारक शेतकऱ्यांना १०० रुपये किलोने आजरा घनसाळचे बियाणे उपलब्ध केले आहे.
तालुक्यातील काहीजण आजरा घनसाळ व काळा जिरगाची बोगस बियाणी विक्री करीत आहेत. बोगस बियाणांची उत्पादन क्षमता कमी आहे. आजरा तालुका शेतकरी विकास मंडळाने विक्रीसाठी उपलब्ध केलेले आजरा घनसाळ व काळाजिरग्याचे बियाणे चांगले असून उत्पादन क्षमता शंभर टक्के आहे. त्यामुळे घनसाळ व काळा जिरगा उत्पादक शेतकऱ्यांनी फसवणुकीपासून सावध रहावे व शेतकरी मंडळाशी संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.