शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
2
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
3
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
4
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
5
टी-२० मध्ये अशी कामगिरी करणारा पहिला भारतीय ठरला हार्दिक पांड्या
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: महायुतीच्या बंपर विजयाचा संघाने रचला पाया; भाजपाने प्रचाराचा ट्रेंडच बदलला
7
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
8
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : भाजपातून शरद पवार गटात प्रवेश केलेल्या नेत्यांचं काय झालं? वाचा सविस्तर
10
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!
11
कश्मिरा शाहच्या नाकावरची पट्टी काढली, पोस्ट करत म्हणाली, "जखमेच्या खुणा..."
12
मविआचा सुपडा साफ, महायुतीनं सत्ता राखली; नवीन सरकारचा शपथविधी पुन्हा वानखेडेवर?
13
विधानसभा निवडणूक निकालानंतर तेजस्विनी पंडितच्या पोस्टने वेधलं लक्ष; म्हणाली, "आमचा राजा..."
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: बहिणींची मोठी साथ, जरांगे फॅक्टर निष्प्रभ; महाविकास आघाडीची पूर्णपणे धूळधाण
15
औक्षण करताना उडाला आगीचा भडका; नवनिर्वाचित आमदार थोडक्यात बचावले
16
कपूर कुटुंबात लग्नाची लगबग, पापाराझींसमोर पडता पडता वाचली करिष्मा; व्हिडिओ व्हायरल
17
आजचे राशीभविष्य - २४ नोव्हेंबर २०२४, मान व प्रतिष्ठा वाढेल, नोकरीत बढतीही होऊ शकते
18
यशस्वी भव:! सिक्सर मारत तोऱ्यात ठोकली सेंच्युरी; जैस्वालची खास क्लबमध्ये एन्ट्री
19
शरद पवारांचा पश्चिम महाराष्ट्र गड अखेर ढासळला; महायुतीने जिंकल्या ५८ पैकी ४६ जागा
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’ची मुसंडी, काँग्रेसचे पानिपत; उद्धवसेनेलाही साफ नाकारले

आजरा पोलीस व वनविभागाची कारवाई, जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2023 9:30 PM

याप्रकारामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे. 

उत्कर्षा पोतदार, लोकमत न्यूज नेटवर्क,  उत्तूर (ता.आजरा):  आजरा-आंबोली मार्गावर गवसे (ता. आजरा) नजिक १० कोटी ७४ लाख रूपयांची व्हेल माशाची उलटीची तस्करी करताना जप्त करण्यात आली. आजरा पोलीस व वनविभागाने शनिवार (ता.27) रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई आहे.

याप्रकरणी शिवम किरण शिंदे (वय २३, रा. अभिनव नगर नं. २ कुडाळ जि. सिंधुदुर्ग) या मुख्य सुत्रधारासह अकबर याकूब शेख (वय ५१, रा. पिंगोली, मुस्लमवाडी, ता कुडाळ), गौरव गिरीधर केरवडेकर (वय ३३, रा. केरवडे तर्फ माणगाव, ता. कुडाळ), इरफान इसाक माणियार (वय ३६, रा. पोष्ट ऑफीस गणेश नगर, कुडाळ), फिरोज भाऊद्दीन ख्वाजा (वय ५३, रा. कोलगाव, ता. सावंतवाडी) यांना पोलीसांनी ताब्यांत घेतले आहे. तसेच एक चारचाकी व एक दुचाकी जप्त करण्यात आली आहे. याप्रकारामुळे आजरा तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ माजली आहे.      आजर्‍याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील हारूगडे यांना गोपनीय बातमीदाराकडून सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आजरा तालुका मार्गे व्हेल माशाची उलटीची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलीस अधिक्षक पंडीत, अप्पर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राजीव नवले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि हारूगडे, पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव यांनी पोलीसांचे एक पथक तयार केले. या पथकाने शनिवारी सकाळी ९ वाजल्यापासून आजरा-आंबोली मार्गावर गस्त सुरू केली.

या पथकाने आंबोली पर्यंत तसेच परिसरातील जंगलभाग, धरणभागात गस्त सुरू केली. त्याचबरोबर घाटकरवाडी (ता. आजरा) येथे नाकाबंदी सुरू करून कोकणातून येणार्‍या दुचाकी व चारचाकी गाड्यांची तपासणी सुरू केली. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास गवसे जवळ टाटा सफारी (एमएच ०१ बीसी ०५९०) या गाडीची तपासणी केली. यात असणार्‍या तीघांजणांकडे पोलीसांनी चौकशी केली. त्यावेळी त्यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे पोलीसांचा संशय बळावला.

त्यांच्याकडे अधिक चौकशी सुरू केली. तसेच त्यांचे मोबाईल तपासण्यात आले. त्यांचे व्हेल माशाच्या उलटी तस्करीशी लागेबंध असल्याचे दिसून आले. त्यानुसार पोलीसांनी सापळा रचला. यावेळी मोटारसायकलवरून (एमएच ०७ एडी ७७५८) येणार्‍या दोघांकडे काळ्या सॅकमध्ये व्हेल माशाची उलटी असल्याचे अढळून आले. यावेळी दोन शासकीय पंच व वनविभागाचे दोन अधिकारी यांच्यासमवेत तस्करीच्या मालाची पहाणी केली असता ती व्हेल माशाची उलटी असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पाच जणांना ताब्यात घेण्यात आले.

व्हेल माशाच्या उलटीचे वजन १० किलो ६८८ ग्रॅम आहे. याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत १० कोटी ७४ लाख आहे. पोलीस पथकात सपोनि हारूगडे, उपनिरीक्षक जाधव यांच्यासह दत्तात्रय शिंदे, प्रशांत पाटील, विशाल कांबळे, विकास कांबळे, प्रदीप देवार्डे यांचा समावेश होता. परिक्षेत्र वनाधिकारी स्मिता डाके यांच्या मार्गदर्शनाखाली बाळेश न्हावी व गुरूनाथ नावगेकर हे वनकर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूर