शहरं
Join us  
Trending Stories
1
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
2
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
3
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
4
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
5
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
6
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
7
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
9
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
10
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
11
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
13
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
14
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
15
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
16
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा
17
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
18
ऐकावं ते नवलच! १२ वर्षे जुन्या कारचे अंत्यसंस्कार, चार लाख खर्च करुन बांधली समाधी
19
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
20
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष

आजरा तालुक्याचे लक्ष मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 09, 2020 12:39 PM

kolhapur, Sugar factory, hasanmusrif तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देआजरा तालुक्याचे लक्ष मुश्रीफ यांच्या भूमिकेकडे साखर कारखान्याचा प्रश्न, तातडीने निर्णय घेण्याची गरज

समीर देशपांडेकोल्हापूर : तिसऱ्यांदा खासगी कंपनीकडे जाणारा आजरा साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहू देण्याबाबत आता राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण आजरा तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे. हा सकारात्मक निर्णय तातडीने झाल्यासच आजरा कारखान्याचे अडलेले गाडे रुळावर येण्याची शक्यता आहे.गेल्या वर्षीचा गळित हंगाम घेता आलेला नव्हता. संचालक मंडळ आणि कारखाना कर्मचारी यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला होता. जिल्हा बँकेचे कर्जाचे हप्तेही रखडले. परिणामी कारखाना चालविण्यासाठी निविदा काढण्यात आली. मात्र यासाठी केवळ एकाच कंपनीची निविदा आल्याने ती जिल्हा बँकेच्या २५ सप्टेंबरच्या बैठकीत रद्द केली.याच बैठकीत जिल्हा बँक आणि कारखाना व्यवस्थापनामध्ये कारखाना स्वबळावर चालविण्यासाठी सकारात्मक चर्चा झाली. कर्मचाऱ्यांनी पगारकपातीसाठी लेखी तयारी दर्शवली तरच हे होणार असल्याने, तसे लेखी पत्रही बँकेला सादर करण्यात आले आहे.संचालकांनी बँकेला दिलेल्या पत्रातील मुद्दे१. कर्मचारी पगारामध्ये कपात२. उत्पादन खर्चामध्ये काटकसर३. ४ लाख टन उसाची गाळपासाठी उपलब्धता४. तोडणी व वाहतुकीसाठी २५० टोळ्यांची गरज. स्थानिक पातळीवर यंत्रणा उपलब्ध५. मशिनरी दुरुस्ती व देखभालीसाठी २० कोटींची गरज६. शासकीय मूल्यांकनानुसार कारखान्याच्या मालमत्तेचे १०४ कोटी रुपये मूल्यांकन झाले आहे.७. जिल्हा बँकेचे माल तारण कर्ज सोडून ४० कोटी रुपयांचे कारखान्यावर कर्ज८. गळित हंगाम सुरू करण्यासाठी आणखी ४५ कोटींच्या कर्जाची गरज.लोकमतच्या भूमिकेवर शिक्कामोर्तबगेल्या वर्षी कारखाना अडचणीत आला असताना ह्यलोकमतह्णने दोन भागांच्या मालिकेद्वारे कुणीही, काहीही म्हणाले तरी कामगारांच्या त्यागावरच कारखाना चालविण्यासाठी घेणे अवलंबून राहणार आहे, अशी स्पष्ट भूमिका मांडली होती. तेव्हा संघटनेच्या काही पदाधिकाऱ्यांनी याबाबत आकांडतांडव केले होते. मात्र जिल्हा बँकेच्या चर्चेतही कर्मचाऱ्यांच्या पगाराचाच मुद्दा पहिल्या क्रमांकावर राहिला आणि कर्मचाऱ्यांनी पगार कपातीला तयार असल्याची स्वागतार्ह भूमिका घेतली.मुश्रीफच आधारवडअनेक वर्षे बंद पडलेला चंदगडचा दौलत साखर कारखाना हसन मुश्रीफ यांच्याच पुढाकाराने आजरा तालुक्याचे सुपुत्र मानसिंग खोराटे चांगल्या पद्धतीने चालवत आहेत. मुश्रीफ यांनीच निर्णय घेतल्यामुळे गडहिंग्लजचा साखर कारखाना पुण्याच्या कंपनीकडून चालविण्यात येत आहे. आता आजरा कारखान्याबाबतीत निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मुश्रीफच याबाबत निर्णय घेऊ शकतात. फक्त त्यांनी तो तातडीने घेतल्यास यंदाचा गळित हंगाम पदरात पडण्याची शक्यता आहे. कर्मचाऱ्यांचे संसार उघड्यावर पडण्यापासून वाचणार आहेत.महाविकास आघाडीवाले एकत्रकारखान्याचे अध्यक्षपद सध्या शिवसेनेच्या सुनील शिंत्रे यांच्याकडे आहे. त्यामुळे मंत्री एकनाथ शिंदे यांनीही मुश्रीफ यांच्याकडे याबाबत आग्रह धरला आहे. संचालक मंडळात राष्ट्रवादी आणि काँग्रेस, भाजपवालेही आहेत. त्यामुळे राजकीयदृष्ट्याही आजरा कारखाना सुरू करणे हे महाविकास आघाडीच्या फायद्याचे असल्याचे चित्र आहे. राष्ट्रवादीचे आमदार राजेश पाटील आणि शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांनीही तसा आग्रह धरला आहे.

टॅग्स :Hasan Mushrifहसन मुश्रीफkolhapurकोल्हापूरSugar factoryसाखर कारखाने