शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
5
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
6
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
7
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
8
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
9
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
10
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
11
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
12
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
13
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
14
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
15
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
16
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
17
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
18
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
19
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
20
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत

आजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2021 11:18 AM

Banking Sector Kolhapur- महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देआजरा अर्बन बँक निवडणूक बिनविरोध उद्या होणार अधिकृत घोषणा, सभासदांमधून समाधान

कोल्हापूर : महाराष्ट्रातील अग्रगण्य असलेल्या आजरा अर्बन बँकेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली आहे. अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी सोमवारी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, उद्या (बुधवारी) दुपारी ३ वाजता आजरा येथे होणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये बिनविरोधची अधिकृत घोषणा करण्यात येणार आहे.काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने या बँकेची स्थापना केली. आजऱ्यासारख्या ग्रामीण भागामध्ये स्थापन झालेली ही बँक अल्पावधीत महाराष्ट्रातील अग्रगण्य बँक म्हणून नावारूपाला आली.

आजरा, कोल्हापूरसह कोकण आणि पुणे, मुंबई, कर्नाटकात असलेल्या शाखा, मल्टिस्टेटचा मिळालेला दर्जा या सर्व पार्श्वभूमीवर बँकेने आजरा तालुक्याच्या विकासात मोठी भूमिका बजावली. याच बळावर जनता शिक्षण संस्था आणि आण्णा भाऊ सूतगिरणी स्थापन करण्यात आली.काशिनाथ चराटी आणि माधवराव देशपांडे यांच्या निधनानंतरची ही तिसरी पंचवार्षिक निवडणूक होती. पहिल्या दोन निवडणुका झाल्या होत्या. त्यामुळे दुसऱ्या निवडणुकीकडे साऱ्यांचे लक्ष होते. परंतु, आण्णा भाऊ संस्था समूहाचे नेते अशोक चराटी यांनी एकहाती निर्णय घेत सत्तारूढ आघाडीची रचना केली.

विरोधी तीन इच्छुक छाननीमध्ये अपात्र ठरले आणि सोमवारी अर्ज माघारीदिवशी १८ जागांसाठी तितकेच अर्ज शिल्लक राहिले. त्यामुळे चराटी यांच्या नेतृत्वाखाली सत्तारूढ आघाडीने अतिशय सफाईदारपणे ही निवडणूक बिनविरोध करण्यात यश मिळवले. यावेळी विभागीय उपनिबंधक अरूण काकडे यांनी मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. काकडे आता बुधवारी दुपारी ३ वाजता बँकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे अधिकृतपणे जाहीर करतील.सभासदांच्या पाठबळामुळेच बिनविरोध

आजरा अर्बन बँकेचे हजारो सभासद आणि माझ्या सहकाऱ्यांच्या पाठबळावरच ही निवडणूक आम्ही बिनविरोध करू शकलो. याच बळावर आम्ही बँकेची वेगळी ओळख निर्माण केली आहे. यापुढील काळातदेखील सर्वांच्या सहकार्याने बँक शेड्युल्ड करण्याचा आमचा मानस आहे.- अशोक चराटीप्रमुख, आण्णा भाऊ संस्था समूह, आजरा

 

आजरा अर्बन बँक दृष्टीक्षेपात

  • भागभांडवल १७ कोटी ४६ लाख रुपये
  • स्वनिधी ७८ कोटी ४० लाख रुपये
  • ठेवी ७०६ कोटी ४० लाख रुपये
  • कर्जे ३८७ कोटी ८८ लाख रुपये
  • गुंतवणूक ३८२ कोटी ८० लाख रुपये
  • ढोबळ नफा १२ कोटी २३ लाख रुपये
  • सभासद ३३,१६४
  • शाखा ३२

 

टॅग्स :Banking Sectorबँकिंग क्षेत्रElectionनिवडणूकkolhapurकोल्हापूर