शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक: महाविकास आघाडीचं ठरलं, 130 जागांवर एकमत झालं! अस होणार जागावाटप?
2
मुंबईपासून दुरावलेल्या लाखो लोकांना हक्काचे घर देऊन पुन्हा मुंबईत आणू- श्रीकांत शिंदे
3
हिजबुल्लाहच्या हल्ल्यानंतर लेबनॉनमध्ये इस्रायलचा कहर, बेरूत हल्ल्यात 8 जणांसह टॉप कमांडरचा खात्मा; 59 जखमी
4
उल्हासनगर महापालिका सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे उपोषण मागे, सोमवारी होणार चर्चा
5
दिल्लीला मिळणार तिसऱ्या महिला मुख्यमंत्री, आतिशी उद्या घेणार शपथ, मंत्रिमंडळात कोण?
6
रिक्षात गॅस भरण्यासाठी पैसे मागितल्याने डोक्यात लोखंडी रॉडने हल्ला; दारूच्या नशेत कृत्य
7
'मंदिर, मशीद किंवा चर्च...', तिरुपती लाडू वादावर पवन कल्याण स्पष्ट बोलले
8
BSF ची मिजोरममध्ये मोठी कारवाई; भारत-बांगलादेश सीमेवर 40 कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त
9
आता हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 140 रॉकेट; मध्यपूर्वेतील तणाव शिगेला!
10
मुख्यमंत्री जाताच माशांवर तुटून पडले, नितीश कुमारांच्या नावाने केली फिश पार्टी; पाहा video...
11
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
12
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
13
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
14
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video
15
Video: अफलातून! ३५ वर्षांच्या टीम साऊदीने हवेत उडी मारत घेतला भन्नाट झेल, सारे अवाक्
16
अरे देवा! महापौरांनी केली रक्तदानाची 'एक्टिंग'; Video व्हायरल होताच म्हणाले, "मी हार्ट पेशंट..."
17
भारताचा परकीय चलन साठा $223 मिलियन वाढीसह $689.48 बिलियनच्या ऑल टाईम हायवर
18
“...तर मंत्रीपद नको, प्रकाश आंबेडकरांना मंत्री करा”; रामदास आठवलेंची वंचितला खुली ऑफर
19
आताच पैसे बाजूला काढून ठेवा! HDB financial services चा आयपीओ येतोय
20
"आम्ही युक्रेनचे १५,३०० सैनिक मारलेत, गेल्या २४ तासांत.."; रशियन संरक्षण मंत्रालयाचा मोठा दावा

दारू-जुगारही हद्दपार!

By admin | Published: October 04, 2015 9:48 PM

डॉल्बीनंतर आता तडवळे (सं) वाघोली : ग्रामसभेत एकमुखी निर्णय

वाठार स्टेशन : महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधत कोरेगाव तालुक्यातील राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण असलेल्या तडवळे (सं) वाघोली गाव डॉल्बीमुक्त करण्याबरोबरच गावातून दारु व जुगार हद्दपार करण्याचा ठराव सर्वानुमते मंजुर करण्यात आला. तर पिंपोडे बुद्रुकमध्ये दारुबंदीवरुन सत्ताधारी व गावातील तरुणांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली.सरपंच नलिनी भोईटे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी गाव डॉल्बीमुक्त व्हावे, असा ठराव खुद्द सरपंच नलिनी भोईटे यांनी मांडला. याला भगवानराव देशमुख यांनी अनुमोदन दिले. यानंतर हा ठराव सर्वानुमते मान्य करण्यात आला. तसेच गावहद्दीत असलेली सर्व दारु दुकाने व जुगार अड्डे बंद करण्याचा ठरावही यावेळी मंजूर करण्यात आला. गाव टॅँकरमुक्त करण्याबाबत सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.यावेळी उपसरपंच अजित भोईटे, सदस्य विजय भोईटे, तंटामुक्ती अध्यक्ष अशोकराव भोईटे, सदस्य दत्तात्रय ठोंबरे, कल्पना बडेकर, अमोल चव्हाण, निलेश भोईटे, पांडुरंग भोईटे, ग्रामसेवक नवनाथ शिरसागर ग्रामस्थ मोेठ्या संख्येने उपस्थित होते.पिंपोडे बुद्रुकच्या ग्रामसभेत डॉल्बीबंदीचा ठराव यापूर्वीच मंजूर केला होता. याबाबत मंडळाच्या कार्यकत्यांनी नाराजी व्यक्त करत युवकांना या ठरावावेळी विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करण्यात आला. गावात डॉल्बीबंदी असतानाही डॉल्बी वाजवणाऱ्या मंडळांविरोधात दंडात्मक कारवाई करावी किंवा त्यांना ग्रामस्वच्छता करायला लावावी, असा आग्रह तरुणांनी धरला. यावर एका माजी सरपंचांनी माफी मागतली. यानंतर या ठरावास संबंधित युवकांनी संमती दिली.सरपंच मच्छिंद्र केंजळे, उपसरपंच जनार्दन निकम, तंटामुक्ती अध्यक्ष सुधीर साळुंखे, जयेंद्र लेंभे, अशोकराव लेंभे, चंद्रकांत निकम, दौलतराव लेंभे, शांताराम निकम, नरेंद्र वाघांबरे, महेश मोहटकर, लक्ष्मण साळुंखे ग्रामविकास अधिकारी शशिकांत माने यांनी ठरावाचे वाचन केले. (वार्ताहर)पिंपोडेतील दारुबंदीसाठी १२ रोजी सभागोरगरिबांचे संसार उद्ध्वस्त करणाऱ्या दारुबंदीबाबत निर्णय व्हावा, अशी मागणी व्यसनमुक्त युवक संघाच्या कार्यकत्यांनी केली. मात्र, यासाठी गावातील सर्वांनी एकत्रित येऊन ही मोहीम राबवावी, असे मत संजय साळुंखे यांनी मांडले. यासाठी कायदेशीर मार्गाने लढा उभारण्यावरुन जोरदार खलबते झाली. शेवटी दारुबंदीबाबत १२ आॅक्टोबर रोजी विषेश ग्रामसभा बोलवण्याचा निर्णय सर्वानुमते घेण्यात आला.