प्रदीप शिंदे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्य परिवहन महामंडळाच्या कोल्हापूर विभागातील सर्व बसस्थानकांवर आता सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहेत. बसस्थानकांवर होणाऱ्या वाढत्या चोºया व गुन्हेगारीला यामुळे आळा बसण्यास मदत होणार आहे. प्रत्येक स्थानकावर किमान चार सीसीटीव्ही लावण्यात येणार आहेत.ग्रामीण भागातील बसस्थानकांवर प्रवाशांसह विद्यार्थी-विद्यार्थिनी यांची मोठी गर्दी असते. या गर्दीचा गैरफायदा घेण्यासाठी पाकीटमार, खिसेकापू यांचा सुळसुळाट असतो. यासह महिलांचे दागिने चोरीला जाण्याचे प्रकार सर्रास होत आहेत. मुलींच्या छेडछाडीच्याही घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. यामुळे प्रवासी, महिला, शालेय विद्यार्थिनी यांची सुरक्षितता धोक्यात आल्याचे चित्र आहे. त्यामुळे या बसस्थानक आणि परिसरात महिला कर्मचाºयांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यांपैकी एक कॅमेरा थेट आगार व्यवस्थापकांच्या कार्यालयात बसविण्यात येणार आहे. येथील कामकाजाची माहिती वरिष्ठ कार्यालयापर्यंत सहज मिळणार आहे.कॅमेºयांवर दैनंदिन नजर ठेवण्याची जबाबदारी एका कर्मचाºयावर असणार आहे.आक्षेपार्ह घटनेची माहिती तत्काळ वरिष्ठांकडे कळविण्यात येणारआहे.येथे राहणार कॅमेºयांची नजरकोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बसस्थानक व संभाजीनगर बसस्थानकांवर कॅमेरे बसविण्यात आले आहेत. यासह इचलकरंजी, गडहिंग्लज, गारगोटी, मलकापूर, चंदगड, कुरुंदवाड, कागल, राधानगरी, गगनबावडा या बसस्थानकांवर कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. कोल्हापुरातील रेल्वेस्थानक येथील नियंत्रण कक्षासह वाठार, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी, हुपरी, जोतिबा येथील नियंत्रण कक्षांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. आजरा व कोडोली बसस्थानकांचे काम सुरू असल्याने या ठिकाणी पुढील टप्प्यांत कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक ठिकाणी किमान चार कॅमेरे बसविण्यात येणार असून, काही ठिकाणी गरजेनुसार कॅमेरे वाढविण्यात येणार आहेत.
सर्व बसस्थानकांवर आता ‘सीसीटीव्ही’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:32 AM