शहरं
Join us  
Trending Stories
1
"कार्यकर्ता लढला, भल्याभल्यांना नडला, पण...", राम सातपुतेंचा रणजितसिंह मोहिते पाटलांवर मोठा आरोप
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
3
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसला बसला मोठा फटका; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
4
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
5
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
6
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...
7
 विधानसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टर फेल?, महायुतीच्या विजयावर जरांगे पाटलांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: शिवसेना-मनसेच्या विसंवादामुळे उद्धव ठाकरेंचा फायदा; राज ठाकरेंनाही बसला फटका
9
आलिशान घर खरेदी केल्यानंतर विवेक ओबेरॉयने घेतली महागडी कार, झलक दाखवत म्हणाला...
10
देशसेवेचं स्वप्न! लंडनमधली नोकरी सोडली अन् IAS झाली; ७५ वर्षांनंतर गावाला केला पाणीपुरवठा
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: एकनाथ शिंदे ठरले वरचढ, उद्धव ठाकरेंना मोठा फटका; ५१ पैकी केवळ १४ जागाच जिंकल्या
12
"कठोर परिश्रम अन् समर्पणामुळे ही विजयाची गाथा.."; मराठी कलाकारांकडून 'महायुती'चं अभिनंदन
13
कोण १६२ मतांनी तर कोण २०८ मतांनी विजयी; 'या' जागांवर पाहायला मिळाली चुरशीची लढत!
14
"मनोज जरांगे पाटलांचाच सुफडा साफ झाला", विजयानंतर छगन भुजबळ यांचा टोला
15
एकनाथ शिंदेंना साथ देणारे हे आमदार झाले पराभूत, शहाजीबापूंसह या नेत्यांना बसला धक्का
16
Video - "हा सर्व खेळ..."; लाजिरवाण्या पराभवाचं अभिनेता एजाज खानने EVM वर फोडलं खापर
17
महाराष्ट्रातील निकालांचा देशाच्या राजकारणावर किती परिणाम होईल? ६ मुद्द्यांमध्ये समजून घ्या
18
"मी १० वी नापास झालो तेव्हा वडिलांनी केलेलं सेलिब्रेशन", अनुपम खेर यांनी सांगितला किस्सा
19
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "सर्व दिग्गज नेते एकाच वेळी पराभूत होतील असं होऊ शकत नाही, आम्हाला संशय..."
20
'या' दोन नेत्यांनी भाजपच्या विजयात निभावली महत्त्वाची भूमिका, मध्य प्रदेशातही केली होती कमाल!

नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे: कन्हैया कुमार, कोल्हापुरातील सभेला मोठा प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 08, 2017 3:50 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत.  मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. तुम्ही केलेली गद्दारी उघडकीला येईल तेव्हा पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने बुधवारी दिला. 

ठळक मुद्देतर या गद्दारांना लपायला, पळायला जागा मिळणार नाहीकन्हैयाकुमारचा विरोधकांना इशारा

कोल्हापूर :  पंतप्रधान नरेंद्र मोदी काम कमी पण मन की बात ज्यादा करत आहेत. नरेंद्र मोदीचे सर्व दावे फसवे आहेत.  जातीमध्ये भांडण लावण्यात भारी आहेत. चहाचे भांडवल करून देश विकत आहेत.  पण ज्यावेळी हे जनतेला कळेल त्यावेळी मोदींना सत्तेवरून खाली उतरल्यावर शिवाय गप्प बसणार नाहीत. केवळ आणि केवळ थापा मारून समाजामध्ये फूट पाडणाऱ्यांनो मी देशद्रोही असल्याचे १६ महिने झाले तरी सिध्द करता आलेले नाही. मात्र तुम्ही केलेली गद्दारी जेव्हा उघडकीला येईल आणि जनता पेटून उठेल तेव्हा लपायला आणि पळायलाही जागा मिळणार नाही असा इशारा विद्यार्थी नेता कन्हैय्याकुमार याने दिला. 

प्रचंड गर्दीने भरलेल्या केशवराव भोसले नाट्यगृहामध्ये बुधवारी आयोजित ‘लोकशाही वाचवा, देश वाचवा’ परिषदेत तो बोलत होत्या. नोटाबंदीला झालेल्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर सुमारे तासाभराच्या भाषणामध्ये त्याने केंद्र सरकारचे वाभाडे काढले. देशासमोरचे असलेले प्रश्न आणि सत्तारूढांची त्याला बगल देण्याची वृत्ती याची मांडणी करत त्याने अनेक स्थानिक मुद्देही यावेळी हाताळले. आॅल इंडिया स्टुडंस फेडरेशन आणि आॅल इंडिया युथ फेडरेशनच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी उमा पानसरे होत्या. सुरूवातीला गोविंद पानसरे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

नोटबंदीमुळे अनेकांचं जीवन उद्धवस्त झाले आहे. यांना श्रद्धांजली वाहून कन्हैया कुमारने भाषणाला सुरवात केली. गोविंद पानसरे स्वतंत्र सेनानी होते,  यांच्या सर्व पुस्तकाचं वाचन केले आहे. त्याच्या मार्गावर चालणाऱ्या सर्वांनी त्यापासून बोध घ्यावा. देशात देशभक्तीचा  मुखवटा चढवलेल्या राज्यकर्यांनी भाषा बंद करावी. इतिहासात त्याची काही जागा नसून इतिहासात नोंद करण्यासाठी ते इतिहासात बदलत आहेत. 

 छत्रपती शाहू महाराजांचे कार्य मोलाचे आहे. गंगाराम कांबळे यासारख्या दलिताला चहाचा गाडा टाकण्यासाठी मदत करून जातीभेद विसरण्याचा सल्ला देत होते. मात्र दुसरीकडे चायवाले पंतप्रधान नरेंद्र मोदी देश विकण्याचा प्रयत्न करत आहे. त्याचे रंग किती आहेत हेच कळले नाहीत. मी देशद्रोही असलो तरी मला तुरुंगात राहील पाहिजे. मात्र तुरुंगात राहण्यासाठी पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. पण आंदोलन कर्त्यांना फोटोसाठी स्टंट बाजी करू नये.  सरकार तुमचं आहे, कारवाई करायची असेल तर करा. पण देशाविरोधात बोललो असलो तर कारवाई करा.

 

तरुणांना रोजगार, शिक्षण देणे महत्वाचं आहे. याला न्याय मागण्याचा कार्य केले तर अन्य कारनामे काढून विषय भरकवटण्याचे काम केले जाते. नोटबंदीमुळे काळापैसा, भ्रष्टाचार, दहशदवाद कमी असल्याचा दावा केला जात आहे. मात्र सर्वसामान्य नागरिकांना याचा प्रत्यय आला आहे.

ज्यावेळी ते बाजारात जातात त्यावेळी खऱ्या परिस्थितीची जाणीव होते. जीएसटी आणि नोटबंदीमुळे लोकांचं खूप हाल झाले आहे. आणि ह्याचे समर्थन जे करत आहेत ते मोदी भक्त आहेत. ज्यावेळी नोटबंदी झाली त्यावेळी कोणते नेते लाईन मध्ये उभे राहिले नाहीत मात्र सर्व सामान्य नागरिकांचा यात चुराडा झाला.

काळा धन आणण्यापेक्षा गुलाबी धन आणण्यात यश आले आहे. तीन लाख करोड काळा पैसा आल्याचा दावा करत आहात मग बुलेट ट्रेन साठी जपान कडून एक लाख कर्ज घेण्याची गरज काय? असा सवाल ही कन्हैया कुमार याने केला.

कन्हैयाकुमार म्हणाला, मी जर देशद्रोही घोषणा दिल्या असतील तर मी तुरूंगात पाहिजे होतो. माझ्याविरोधात आरोपपत्र दाखल व्हायला पाहिजे होतं. केंद्रात तुमचं सरकार आहे, १८ राज्यात सरकार आहे. मग मुलायम, मायावती, तेजस्वी यादव, लालूप्रसाद यांच्या मागे जशी सीबीआय लावली तशी माझ्या मागे लावून मला शिक्षा का दिली नाही ? सगळं खोटं बोलणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे. कायदा त्याचे काम करू दे. विद्यार्थ्यांना या खोट्या आरोपातून मुक्त करा.

शिक्षण, रोजगार, समानता हे आमचे प्रश्न आहेत. त्याच्यावर चर्चा होऊ नये म्हणून मग असे देशद्रोही,राममंदिर असे विषय उकरून काढले जातात. एक राजनैतिक तुघलकी फर्मान काढून एक वर्षापूर्वी नोटाबंदी झाली. मात्र त्याचा नेमका कुणाला फायदा झाला याचा विचार करा.

कुणी खासदार, आमदार, मंत्री, उद्योगपती नोटा बदलताना दिसला नाही. मात्र सामान्य माणूस रांगेत होता आणि अशी १00 माणसं रांगेतच मृत्यु पावली. काळा पैसा ज्यांच्याकडे आहेत त्यांना तो कसा आणि कुठे ठेवायचा हे माहिती असतं. सामान्य माणूस मात्र जनधन खात्यात काय जमा झालेय हे पहात राहिला.

तीन वर्षे झाली पण महागाई कमी नाही, महिलांवरचे अत्याचार कमी नाहीत, बेरोजगारी वाढतच आहे, नक्षलवाद कमी झाला नाही, दहशतवादी कृत्ये कमी झाली नाहीत, हे सत्तेत आल्यानंतर १२ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, विश्वविद्यालयातील ३९७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, जातीजातीत तणाव वाढला आहे. यांना हिंदूशी देणेघेणे नाही यांना फक्त राजकारण करायचे आहे.

उमा पानसरे म्हणाल्या, पानसरेंचे मारेकरी अजूनही सापडत नाही ही महाराष्ट्रासाठी लाजिरवाणी गोष्ट असून कन्हैया परिवर्तन घडवू पाहतोय याचा मला अभिमान आहे. या सभेसाठी झालेल्या विरोधाचा संदर्भ घेत प्रास्ताविकामध्ये गिरीश फोंडे यांनी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनाही लक्ष्य केले. ते कोल्हापूरपेक्षा मुंबईतच जास्त असतात आणि त्यांचा अधिक वेळा मित्रपक्षांबरोबरचे भांडण मिटवण्यातच जातो. भारत भाजपमुक्त आणि आरएसएसमुक्त करण्याचे आमचे स्वप्न आहे.

प्रशांत आंबी यांच्या हस्ते कन्हैयकुमारचा सत्कार करण्यात आला. यावेळी गोविंद पानसरे यांच्यावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच कन्हैयाकुमार यांच्यावर पुस्तक लिहणाऱ्या अनिल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. हरीष तांबे यांनी प्रास्ताविक केले. धीरज कठारे यांनी सूत्रसंचालन केले तर दिलदार मुजावर यांनी आभार मानले.

यावेळी भालचंद्र कानगो, माजी आमदार संपतबापू पवार पाटील, सरोज पाटील, उदय नारकर, व्यंकाप्पा भोसले, रवि जाधव, प्रा. टी. एस. पाटील, दत्ता मोरे, सुभाष वाणी, चंद्रकांत यादव, एम. बी. शेख, सुमन पाटील, आय. एन. बेग यांच्यासह डाव्या चळवळीतील अनेक कार्यकर्ते युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

म्हणूनच गोविंद पानसरेंची हत्या‘हू किल्ड करकरे’ या पुस्तकाच्या जागृतीसाठी आपण १00 मेळावे घेणार असल्याचे गोविंद पानसरे यांनी जाहीर केले होते. या पुस्तकामध्ये अनेक बाबी मांडण्यात आल्या आहेत. म्हणूनच यातूनच त्यांची हत्त्या झाली असावी असा संशय यावेळी कन्हैयाकुमार याने व्यक्त केला.

पानसरे हिंदूत्ववाद्यांच्या दुकानदारीचे विरोधक होतेसंपूर्ण भाषणामध्ये कन्हैयाकुमारने अनेकवेळा गोविंद पानसरे, नरेंद्र दाभोळकर, विनायक कलबुर्गी, गौरी लंकेश यांचा संदर्भ घेतला. तो म्हणाला, पानसरे हे स्वातंत्रसेनानी होते. शिवाजी कोण होता हे पुस्तक मी वाचले आहे. पानसरे हे हिंदूविरोधी नव्हते तर ते हिंदूत्ववाद्यांच्या दुकानदारीच्या विरोधात होते.

यांनी भगव्याची बदनामी केलीगळ्यात भगवा पट्टा, कपाळावर टिळा आणि तोंडात जय श्रीराम. पण भगवा तर त्याग आणि बहादुरीचे प्रतिक आहे. भगवा शिवाजीचा, संभाजीचा, तुकारामाचा आहे. तुम्ही तर चोरासारखे आलात आणि महात्मा गांधींचा खून करून गेलात. तुम्ही भगव्या रंगाला बदनाम करण्याचे काम केलेत.

तुमच्यापेक्षा इथले मुस्लिम देशप्रेमीतुमच्यापेक्षा इथले मुस्लिम देशप्रेमी आहेत, ते अरबांसारखे वागत नाहीत असे कन्हैय्याकुमार म्हणाला. पहिला दहशतवादी हल्ला शीखांनी केला. मुस्लिमांनी नव्हे. इंदिरा गांधी, राजीव गांधी यांची हत्त्या मुस्लिमांनी केली नाही. मात्र गांधींची हत्त्या तुम्ही केलीत. बाबरी मशिद पाडल्यानंतर मात्र मुस्लिमांकडून विरोधी प्रतिक्रिया येऊ लागल्या. तुम्ही आखख्या समाजालाच जर गुन्हे गार ठरवणार असाल तर त्याला उत्तर मिळणारच. या वादातूनच तुम्हांला जनतेत संभ्रम निर्माण करायचा आहे.

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरPoliticsराजकारण