गडहिंग्लज : केंद्र सरकारने अन्यायी कृषी कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सर्व श्रमिक संघातर्फे येथील तहसील कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावे लिहिलेले निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. अन्यायी कृषी कायद्यांच्या विरोधात दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यात आला. अखिल भारतीय किसान संघर्ष समन्वय समितीच्या आवाहनानुसार हे आंदोलन करण्यात आले. निवेदनात, आंदोलक शेतकऱ्यांवरील अत्याचार थांबवा, शेतीमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट भाव मिळावा, अशी मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात कॉ. पद्मिनी पिळणकर, रामजी देसाई, अमृत कोकितकर, मारुती भोसले, बाळासाहेब मनगुतकर, गोविंद कोकितकर, रामचंद्र दड्डेकर, आण्णाप्पा शिंदे, केरबा पाटील, धोंडिबा क्षीरसागर, बाबू रेडेकर, मारुती गीते, आदी सहभागी झाले होते.
---------------------------------
* फोटो ओळी : गडहिंग्लज येथे सर्व श्रमिक संघातर्फे निदर्शने करण्यात आली. त्यानंतर निवासी नायब तहसीलदार अशोक पाटील यांना पद्मिनी पिळणकर यांनी निवेदन दिले. यावेळी कार्यकर्ते व शेतकरी उपस्थित होते.
क्रमांक : २४१२२०२०-गड-०९