शहरं
Join us  
Trending Stories
1
Ratan Tata News Live:रतन टाटांची अंत्ययात्रा ४ वाजता; वरळी येथील स्मशानभूमीत पार्थिवावर होणार अंत्यसंस्कार
2
काँग्रेसला धक्का! ५ टर्म खासदार राहिलेल्या काँग्रेस नेत्याचा मुलगा मनसेत प्रवेश करणार
3
अमेरिकेनं इस्रायलला एक वर्षात दिले 18,47,15,19,00,000 रुपयांचे शस्त्रास्त्र! लिस्ट बघून धक्का बसेल, डोकं गरगरेल
4
PAK vs ENG : WHAT A MATCH! सपाट खेळपट्टीवर पाकिस्तान 'भुईसपाट', इंग्लंडकडून बेक्कार धुलाई
5
"केवळ जिवंत असतानाच नव्हे, तर मत्यूनंतरही..."; सचिन तेंडुलकरची टाटांना भावपूर्ण आदरांजली
6
महायुतीत कुरघोडी! शिंदे गटाच्या आमदाराचं थेट छगन भुजबळांना चॅलेंज; समोर या, मग...
7
लाईव्ह शोमध्ये रतन टाटांच्या निधनाची बातमी कळताच दिलजीतच्या 'या' कृतीचं होतंय नेटकऱ्यांकडून कौतुक
8
Kareena Kapoor : "पुरुषांचं वर्चस्व असलेल्या इंडस्ट्रीत टिकून राहणं कठीण"; करीना कपूरने सांगितला अनुभव
9
चाहत्यांच्या गर्दीत सूरज चव्हाणची तब्येत बिघडली; अंकिता म्हणते, 'त्याला सांभाळायची गरज...'
10
रतन टाटांच्या अंत्यसंस्काराला केंद्रातून अमित शाह येणार; पंतप्रधान मोदी परदेश दौऱ्यावर
11
रतन टाटांच्या निधनानंतर काय आहे आज कंपनीच्या शेअर्सची स्थिती, किती झाली वाढ किंवा घसरण?
12
Ratan Tata : आजारी कर्मचाऱ्याला पाहायला पुण्याच्या घरी गेले होते रतन टाटा; हा किस्सा सांगून जातो त्यांचा मोठेपणा...
13
संजय राऊतांविरोधात पोलिसांकडून गुन्हा दाखल; लाडकी बहीणविषयी केलेलं वक्तव्य पडलं महागात
14
कर्मचाऱ्याचा जीव वाचवण्यासाठी विमान उडवायला तयार झाले होते रतन टाटा, नेमकं काय घडलं होतं? पुण्यातला आहे किस्सा
15
निवडणुकीपूर्वीच काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत गटबाजी; मुख्यमंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू?
16
Ratan Tata Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले रतन टाटा; दानच ९००० कोटींवर केलेले...
17
अमिताभ बच्चन यांच्या सिनेमातून रतन टाटांनी घेतली होती बॉलिवूडमध्ये एन्ट्री, पण सिनेमा फ्लॉप ठरला अन्...
18
बापरे! विमान तब्बल ३४००० फूट उंचीवर असतानाच पायलटचा मृत्यू; नेमकं काय घडलं?
19
'ताज' बाहेरचे 'ते' कुत्रे आज पुन्हा पोरके झाले...टाटांनी मिळवून दिली होती हक्काची जागा!
20
Congo Fever : राजस्थानमध्ये खतरनाक आजाराची एन्ट्री; कांगो तापाने महिलेचा मृत्यू, सरकारने जारी केला अलर्ट

‘थेट पाईपलाईन’चे सर्व परवाने तीन महिन्यांत

By admin | Published: January 06, 2017 12:20 AM

अमल महाडिक : कामाचा प्राधान्यक्रम ठरवा

कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने येत्या मार्चपर्यंत देण्यात येतील. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने कामाचा प्राधान्यक्रम ठरवून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत केले. योजनेचे काम सुरू करण्यास जलसंपदा विभागाने कालच परवानगी दिली असून, कामात सातत्य ठेवावे, असेही त्यांनी सांगितले. थेट पाईपलाईन योजनेच्या परवानगीबाबत माझी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बैठक झाली असून, परवानगीअभावी काम थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. जॅकवेल, पंपहाऊस, इंटकवेल, आदी कामे सुरू करावीत, असे महाजन यांनी सांगितल्याची माहिती आमदार महाडिक यांनी दिली. पाणी योजनेच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवा. त्यानुसार काम करा. प्रत्येक आठ-दहा दिवसांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली कामाचा आढावा घेण्याकरिता बैठक घ्या, कामाची माहिती द्या, शासन स्तरावर काही मदत लागणार असेल तर मला सांगा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. फायर स्टेशनचे सक्षमीकरण करणारटिंबर मार्के ट व फुलेवाडी येथील अग्निशमन दलाची स्थानके अधिक सक्षमीकरण करण्याकरिता राज्य सरकारचा निधी मिळतो, पण तो मिळविण्याकरिता मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे. पाठपुरावा होत नाही. तथापि, आपण स्वत: या कामात लक्ष घातले असून नागपूरच्या धर्तीवर कोल्हापुरातही पंधरा दिवसांत परवानगी मिळेल. उंच इमारतींकरिता टर्नटेबल वाहन घेण्यासही जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले. समन्वय अधिकारी नेमावा महानगरपालिका आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यात अधिकारी कमी पडतात. प्रस्ताव पाठविले की, त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे अशा कामासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा. तो केवळ पाठपुरावा, आमच्याशी समन्वय ठेवून राहील, अशी सूचना महाडिक यांनी यावेळी केली. यावेळी विजय सूर्यवंशी, सत्याजित कदम, सुनील कदम, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, पूजा नाईकनवरे, आदींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या. आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.