येथील हॉटेल सूर्यामध्ये आयोजित चंदगड, गडहिंग्लज, आजरा तालुक्यातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.
मुश्रीफ म्हणाले, गेली २० वर्षे ज्या पद्धतीने सत्ता राबवली गेली त्याचा प्रचंड राग मतदारांमध्ये पदोपदी जाणवतो. म्हणूनच, गोकुळ दूध संघ मल्टीस्टेट करून घशात घालण्याचे कारस्थान सभासदांनी हाणून पाडले.
आमदार राजेश पाटील म्हणाले, गडहिंग्लज, आजरा व चंदगड या तिन्ही तालुक्यांत आपल्या आघाडीची बाजू भक्कम आहे. विजयासाठी अहोरात्र झटणाऱ्या कार्यकर्त्यांनी आपल्या आघाडीला मताधिक्य देण्याचा निर्धार केला आहे.
जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सतीश पाटील म्हणाले, मी स्वतःच उमेदवार आहे, असे समजून काम करीत आहे. पक्ष व संघटना यास महत्त्व देणारा व नेत्यांचे आदेश मानणारा मी सच्चा व लढवय्या कार्यकर्ता आहे. मी या निवडणुकीत मताधिक्यासाठी रक्ताचे पाणी करेन.
यावेळी रामाप्पा करीगार, उदय जोशी, वसंतराव धुरे, विष्णुपंत केसरकर, सुधीर देसाई, अमर चव्हाण, जयसिंग चव्हाण, अभय देसाई, अभिजीत पाटील, बाबासाहेब पाटील, सोमगोंडा आरबोळे, गंगाधर व्हसकोटी, संतोष पाटील, जयकुमार मुन्नोळी, राकेश पाटील, प्रकाश पताडे, काशिनाथ तेली मारुती घोरपडे आदी उपस्थित होते.
---------
फोटो ओळी : गडहिंग्लज येथे आयोजित गडहिंग्लज विभागातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या बैठकीत ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांनी मार्गदर्शन केले.
***