शहरं
Join us  
Trending Stories
1
नसराल्लाह मारला गेला? हिजबुल्लाहच्या मुख्यालयावर इस्रायलचा मोठा हल्ला
2
"मला क्लीन चिट मिळाल्यामुळेच चांदीवाल आयोगाचा अहवाल दडवला", अनिल देशमुखांचा शिंदे सरकारवर आरोप
3
सरकारची मोठी कारवाई, Aadhaar आणि PAN Card चा डेटा लीक करणाऱ्या ३ वेबसाइट्स ब्लॉक! 
4
Ujjain Mahakal Temple Wall Collapse: उज्जैनच्या महाकाल मंदिराजवळ मोठी दुर्घटना! मुसळधार पावसाने भिंत कोसळली, दोघांचा मृत्यू
5
'त्या' दोन अल्पवयीन मुलींवर आणखी ७ जणांनी अत्याचार केल्याचे उघड!
6
शून्य मोजून थकाल; भारतात लॉन्च झाली Rolls-Royce ची सर्वात महागडी कार, किंमत तब्बल...
7
Rohit Sharma Team India, IND vs BAN 2nd Test: "रोहित शर्माला ही आकडेवारी दाखवा..."; माजी मुंबईकर क्रिकेटर संतापला
8
भारताने कलम 370 लागू करावी; संयुक्त राष्ट्राच्या मंचावर शाहबाज शरीफ यांनी गरळ ओकली
9
"दलित समाजाचा मुख्यमंत्री व्हावा", कुमारी सैलजा यांचा पुन्हा मुख्यमंत्रीपदावर दावा
10
सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेला ठाणे येथून अटक; तीन पिडित तरुणींची सुटका
11
Giriraj Singh : केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांना जीवे मारण्याची धमकी, पाकिस्तानातून आला व्हॉट्सॲप कॉल
12
An Se-young Shocking Revelations, Paris Olympics 2024: "मला त्यांनी अंतर्वस्त्रे धुवायला लावली"; ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट खेळाडूचा आरोप
13
"ती म्हणाली मला तुझ्यासोबत वेळ घालवायचाय", युवीने सांगितला अभिनेत्रीसोबतचा किस्सा अन् मोठा खुलासा
14
"PM ज्याच्यावर घोटाळ्याचा आरोप करतात, त्याला DCM बनवतात", केजरीवाल यांचा सभागृहातून हल्लाबोल
15
मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्याविरोधात एफआयआर दाखल, MUDA प्रकरणात पोलिसांची कारवाई! 
16
ना तिकीट, ना रिझर्व्हेशन, भारतामधील एकमेव ट्रेन, जिच्यामधून करता येतो मोफत प्रवास
17
महाराष्ट्रात हजारो जणांना ३०० कोटींचा गंडा घातला, मथुरेत साधूच्या वेशात लपला, अखेर पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
18
काँग्रेसच्या १३ बंडखोर नेत्यांवर कारवाई, ६ वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी!
19
Ranbir Kapoor : वयाच्या अवघ्या १४ व्या वर्षी रणबीर कपूरने कामाला केली सुरुवात; आईला दिला पहिला पगार
20
अग्निवीरांसाठी खूशखबर; 'ब्रह्मोस'मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, कंपनी देणार आरक्षणाचा लाभ

सर्वच क्षेत्रातील घडी विस्कटणार; हजारोंच्या उपस्थितीत वसगडेची यात्रा उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 12:10 AM

गांधीनगर : राज्यात कोणताही ताळमेळ बसणार नाही, सर्वच क्षेत्रात घडी विस्कटणार आहे. रसभांडे आहे, तसे राहणार आहे. रोहिणीचा पाऊस ...

गांधीनगर : राज्यात कोणताही ताळमेळ बसणार नाही, सर्वच क्षेत्रात घडी विस्कटणार आहे. रसभांडे आहे, तसे राहणार आहे. रोहिणीचा पाऊस होईल, देवधर्मासाठी सर्व गाव एकत्र येईल, अशी भाकणूक फरांडेबाबा आबादेव वायकुळे यांनी हजारो भाविकांच्या उपस्थितीत सांगितली. वसगडे (ता. करवीर) येथे भाकणूक व हेडाम खेळावेळी भंडाऱ्याची अमाप उधळण करण्यात आली. ‘विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं’च्या गजरात धनगरी ढोलांच्या निनादाने आसमंत दणाणून गेला.गावकामगार पोलीसपाटील संजय पाटील यांच्या घरापासून वाजत गाजत शिरसाव (जिल्हा उस्मानाबाद) येथील आबादेव वायकुळे (फरांडेबाबा) यांना मंदिरासमोरील दगडी गादीवर बसविण्यात आले होते. तत्पूर्वी तिपगौडा पाटील हे कांबळ घेऊन आले. सरपंच नेमगोंडा पाटील, उपसरपंच संदीप कामत, यात्रा कमिटीचे सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, मानकºयांनी फरांडेबाबांना घेऊन मंदिरासमोर आले. संजय पाटील यांनी कांबळाचे पूजन करून तलवार फरांडेबाबांकडे सुपूर्द केली. तेथून भंडारा उधळणीत हेडाम खेळत बाबा मंदिरात आले. तेथे हजारो भाविकांना त्यांनी भाकणूक सांगितली.भाकणुकीनंतर फरांडेबाबांनी पोलीसपाटील संजय पाटील यांच्या घरी अंघोळ करून उपवास सोडला. सायंकाळी पालखी मिरवणूक पार पडली. यावेळी उसाने भरलेल्या ११ बैलगाडीतील ऊस लुटण्याचा कार्यक्रम पार पडला. फरांडेबाबांसोबत सुमारे पाचशे भाविक जेवणाला जातात. कोणताही जात-धर्म न पाळता सकाळी साडेसहा वाजल्यापासून जेवणाला सुरुवात होते. यात्रेनिमित्त मंदिरावर आकर्षक रोषणाई केल्यामुळे मंदिर परिसर उजळून गेला आहे. घोंगडी, खाद्यपदार्थ, पाळणे, नारळ, कापूर, साखर, खेळण्यांची दुकाने भाविकांनी फुलून गेली होती. यावेळी गांधीनगर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.