कोल्हापूर : केंद्रीय प्रवेश प्रक्रिया समितीकडे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अकरावीला प्रवेश मिळणार आहे. प्रवेश क्षमतेपेक्षा कमी अर्ज दाखल झाल्याने यावर्षी प्रवेशाची चिंता करण्याची गरज नाही.शहरातील विविध ३३ महाविद्यालयांतील अकरावीच्या कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेची एकूण प्रवेश क्षमता १३५०० इतकी आहे. यावर्षी एकूण १४६२३ अर्जांची विक्री झाली. त्यापैकी १२७०१ अर्ज प्रवेश प्रक्रिया समितीकडे दाखल झाले आहेत. त्यात विज्ञान शाखेसाठी ६०९४, वाणिज्य मराठीसाठी २९३३, इंग्रजीकरिता १८२५, कला मराठी शाखेसाठी १७८९, तर इंग्रजीसाठी ५२ अर्ज आहेत. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा २१२ अर्ज जादा संकलित झाले आहेत. विज्ञान शाखेसाठी ६५४, तर वाणिज्य शाखेकरिता ३६२ अर्ज अधिक आहेत; त्यासाठी काही महाविद्यालयांना तुकडी वाढवून देण्याचे नियोजन समितीकडून केले जाणार आहे. एकंदरीतपणे पाहता उपलब्ध एकूण प्रवेश जागांपेक्षा ७९९ अर्ज कमी आहेत; त्यामुळे अर्ज केलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला प्रवेश निश्चितपणे मिळणार आहे. सध्या समितीकडून अर्जांच्या छाननीची प्रक्रिया सुरू आहे. निवड यादीची प्रसिद्धी सोमवारी होणार आहे.गेल्यावर्षीचा शाखानिहाय ‘कट आॅफ लिस्ट’ (टक्के)महाविद्यालय विज्ञान वाणिज्य (मराठी) वाणिज्य (इंग्रजी) कलान्यू कॉलेज ९२.२० ८१.८० - ७०.६०विवेकानंद महाविद्यालय ९०.०० ७५.२० ८०.८० ३७.००राजाराम कॉलेज ९०.८० - - ६३.६०गोखले कॉलेज ८२. २० ५८.४० - ३६.००कमला कॉलेज ८४.०० ७७.४० ७१.८० ३८.००एस. एम. लोहिया ज्यु. कॉलेज ८८.६० ७१. ८० - ६४.००कॉमर्स कॉलेज - ७४.८० ८६.२० -शहाजी कॉलेज - ६३.०० - ३७.००महावीर कॉलेज ७२.२० ६१.०० - ३६.४०महाराष्ट्र हायस्कूल व ज्यु. कॉलेज ८७.६० ७५.६० - ६१.६०मेन राजाराम हायस्कूल व ज्यु. कॉलेज ८४.६० ७१.८० - ४२.००राजर्षी छत्रपती शाहू कॉलेज, कदमवाडी ७५.६० ५५. ६० - ३७.६०प्रिन्सेस पद्माराजे ज्यु. कॉलेज फॉर गर्ल्स ८३.८० ७०.२० - ३६.२०डी. डी. शिंदे सरकार कॉलेज - - ७६.२० -शाखानिहाय शहरातील उपलब्ध जागाकला ३८४०वाणिज्य ४१२०विज्ञान ५४४०गेल्यावर्षीच्याप्रवेश अर्जांची संख्याविज्ञान ५९६८वाणिज्य (इंग्रजी) १४२९वाणिज्य (मराठी) २७१६कला १७७७
सर्वच विद्यार्थ्यांना अकरावीत प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2018 12:05 AM