शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

ढपल्याचा आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत : पाटील

By admin | Published: May 28, 2017 12:58 AM

इचलकरंजीतील भुयारी गटार योजना प्रकरण : दुसऱ्याचे श्रेय लाटणे थांबवा

लोकमत न्यूज नेटवर्क --इचलकरंजी : येथील भुयारी गटार योजनेत मोठा ढपला पाडला असल्याचा भारतीय जनता पक्षाचे पक्षप्रतोद तानाजी पोवार यांनी केलेला आरोप म्हणजे शिळ्या कढीला ऊत आणण्याचाच प्रकार आहे. तत्कालीन शहर विकास आघाडीचे सदस्य असलेल्या पक्षप्रतोदांनी या योजनेला मंजुरी देताना काय ‘अर्थ’ घेतला याचाही खुलासा करावा. सत्ता आली म्हणून सर्व चांगले आम्हीच केले असा कांगावा करून दुसऱ्याच्या कामाचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न त्यांनी थांबवावा, असा टोला काँग्रेसचे पक्षप्रतोद सुनील पाटील यांनी लगावला आहे. योजनेच्या परिस्थितीची पूर्ण माहिती न घेता सीआयडी चौकशी करण्याची मागणी म्हणजे बालीशपणाच दिसून येतो. शहापूर व कबनूर या वाढीव भागातील सांडपाण्याचा निचरा व्हावा व प्रदूषणाला आळा बसण्यासाठी केंद्र शासनाच्या युआयडीएसएसएमटी योजनेतून भुयारी गटर योजना मंजूर करण्यात आली. आघाडीने सुरुवातीला या योजनेला विरोध करणार असे सांगितले होते. प्रत्यक्षात मात्र सभेत आघाडीच्या सर्वच सदस्यांनी एकमताने या ठरावाला मंजुरी दर्शविली. या योजनेसाठी सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी (एसटीपी) जागा नगरपरिषदेच्या ताब्यात नसल्याची गंभीर बाब काँग्रेसचे तत्कालीन गटनेते बाळासाहेब कलागते यांनी उघडकीस आणली होती. त्याचेही श्रेय आता भाजप लाटू पाहत आहे.योजनेच्या चौकशीची यापूर्वीच मागणीयोजनेचे कामकाज युद्ध पातळीवर सुरू झाल्यानंतर काम निकृष्ट होत असल्याबद्दल नागरिकांच्या तक्रारी वाढल्या. त्याची गांभीर्याने दखल घेत काँग्रेसचे नगरसेवक शशांक बावचकर यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडे १५ नोव्हेंबर २०१५ रोजीच्या पत्राद्वारे सदर योजनेची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी केलेली आहे. त्याची प्रतसुद्धा आमदार सुरेश हाळवणकर यांना दिलेली आहे. त्याचबरोबर २९ जून २०१६ रोजीच्या पत्राद्वारे या योजनेची त्रयस्थ संस्थेकडून तपासणी करावी, अशी मागणीही बावचकर यांनी नगरविकास विभागाचे प्रधान सचिव यांच्याकडे केली असल्याचे पाटील यांनी सांगितले.