आपल्या मुलीला घेऊन आरोग्य केंद्रात गेल्यानंतर डॉ. एस. एस. माेरे यांनी तिची परिस्थिती बिकट असल्याचे सांगून भोगावती येथील खासगी रुग्णालयात जाण्यास सांगितले. दवाखान्याची गाडीही दिली नाही. त्यामुळे यानंतर मला भोगावती येथे खासगी आणि नंतर कोल्हापुरातील खासगी दवाखान्यात मुलीला दाखल करावे लागले. त्यासाठी मोठा खर्च आला आहे. खासगी डॉक्टरांकडून कमिशन घेऊन रुग्णांची लूट होत असल्याचा आरोप भिऊंगडे यांनी निवेदनातून केला आहे.
याबाबत डॉ.एस. एस. मोरे यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी सांगितले, मुलीची प्रकृती खरोखरच गंभीर होती. त्यांच्यासोबत कोणीही पुरुष नव्हते. दवाखान्याच्या रुग्णवाहिकेपेक्षा १०८ बोलावून सेवा रुग्णालय बावडा येथे मुलीला न्या, असे आम्ही सांगितले; परंतु त्यांनी मुलीच्या नवऱ्याला फोन केल्यानंतर त्यांनी भोगावती येथे नेहमी ज्या डॉक्टरांना दाखवता तेथेच न्या, असे सांगितले. बाळाभोवतीचे पाणी झपाट्याने कमी होत असल्याने आम्ही त्यांना हलवण्यास सांगितले होते. याआधीही कोरोना काळात आम्ही येथे प्रसूती केल्याने आरोप चुकीचा आहे.