शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

सत्तारूढांमध्येच आरोप-प्रत्यारोप

By admin | Published: July 25, 2014 11:56 PM

इचलकरंजी नगरपालिका सभा : शाब्दिक चकमक, ६९ विषयांचा फैसला

इचलकरंजी : नगरपालिकेच्या सभेमध्ये सत्तारूढ कॉँग्रेस आघाडीच्या नगरसेवकांमध्येच वारंवार उडणारी शाब्दिक चकमक, आरोप-प्रत्यारोप यामुळेच सभा वादळी ठरली. नवनिर्वाचित नगराध्यक्षा शुभांगी बिरंजे यांच्या अध्यक्षतेखालील पहिलीच सभा स्मरणीय ठरली. तब्बल चार तास चाललेल्या सभेत ६९ विषयांवर निर्णय झाले.सभेच्या सुरुवातीलाच फेब्रुवारी २०१४ मध्ये झालेल्या पालिकेच्या सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त लिहून तयार नाही. सहा महिने उलटले, तरी इतिवृत्त सभेसमोर येत नसल्याबद्दलची तक्रार नगरसेवक विठ्ठल चोपडे यांनी केली. त्यावर उत्तर देताना मुख्याधिकारी सुनील पवार यांनी, इतिवृत्त पूर्ण करण्याच्या प्रस्तावासाठी संबंधित सूचक-अनुमोदक नगरसेवक स्वाक्षऱ्या देत नाहीत. परिणामी इतिवृत्तास दिरंगाई होत असल्याचे सांगितले.त्यानंतर सभेच्या विषय पत्रिकेवरील विषय क्रमांक २८, ३०, ३४, ३७, ४२, ४३, ४८, ५२, ५३, ५५, ५८, ६७, ६८ व ६९ या कागदपत्रांच्या फाईल नाहीत. फाईल नसतानाही सभेच्या विषयपत्रिकेवर विषय घेतले आणि त्या विषयांना मुख्याधिकाऱ्यांनी टिप्पणीसुद्धा कशाच्या आधारे दिली, असा प्रश्न उपस्थित करीत नगरसेवक चोपडे यांनी हरकत घेतली. यावेळी सत्तारूढ व विरोधी दोन्ही बाजूच्या नगरसेवकांनी आश्चर्य व्यक्त करीत हरकत घेतली. सुमारे अर्धा तास या विषयावर जोरदार चर्चा झाली आणि कागदपत्रांच्या फाईल नसलेले विषय पुढील सभेत घेण्याचे ठरविण्यात आले.आयजीएम दवाखान्याकडे स्त्री रोगतज्ज्ञ प्रतिनियुक्तीवर मिळण्यासाठी शासनाकडे प्रयत्न करणे, मोठे तळे ते टिळक पुतळा रस्ता रुंदीकरण, अनधिकृत बांधकामांना आणि औद्योगिक क्षेत्रातील पाणी जोडण्या, कृष्णा नळ पाणीपुरवठा योजनेची दाबनलिका अंशत: बदलणे, महात्मा बसवेश्वरांच्या पुतळ्यासाठी जागा, मध्यवर्ती एस. टी. बसस्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देणे, पालिकेकडील सुलभ शौचालयाकडील कर्मचाऱ्यास मानधन देणे, पाणी टंचाई निवारणासाठी दोन कोटींची योजना, आयजीएम दवाखान्याकडे औषध खरेदीसाठी एक कोटी रुपयांची तरतूद, लहान रस्ते-बोळ कॉँक्रिटीकरण, इमारती व सार्वजनिक शौचालये दुरुस्ती, गटार बांधणी अशा विषयांवर सभेत निर्णय झाले. नगराध्यक्षा बिरंजे नवनिर्वाचित असूनसुद्धा त्यांनी पहिलीच सभा प्रभावीपणे हाताळली. सभेमध्ये उपनगराध्यक्ष रणजित जाधव, पक्षप्रतोद सुनील पाटील, गटनेते बाळासाहेब कलागते, शशांक बावचकर, नगरसेविका सुनीता मोरबाळे, छाया पाटील, हेमलता आरगे, ‘शविआ’ चे तानाजी पोवार, सयाजी चव्हाण, सुप्रिया गोंदकर, महादेव गौड, भाऊसाहेब आवळे, नितीन जांभळे, अशोकराव जांभळे, अब्राहम आवळे, संभाजीराव काटकर, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी)-पाणी टंचाई निवारणासाठी दोन कोटी-विषयांच्या फाईलच नसल्याची हरकत-एस.टी.स्थानकास छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव-आयजीएमसाठी एक कोटींची तरतूदप्रभाग क्रमांक सहामधील तांबेकर-हाळवणकर घर ते हाळकूर किराणा स्टोअर्स या रस्त्यांचे डांबरीकरण झाले नसल्याने संबंधित मक्तेदाराच्या अंतिम बिलाची रक्कम अदा करू नये, अशी लेखी हरकत त्याच प्रभागातील नगरसेविका सारिका धुत्रे यांनी घेतली आणि सभेत खळबळ उडवून दिली. त्यावेळी झालेल्या चर्चेत, संबंधित प्रभागातील कामांसाठी नगरसेविकेला विश्वासात घेतले जात नाही, असा खुलासा झाल्यावर या विषयावर पडदा पडला.