त्या म्हणाल्या शासनाच्या विविध योजनेच्या माध्यमातून मिळणारा निधी व नगर परिषद स्वनिधीमधून शहरात विविध प्रकारची नागरी विकास कामे राबविण्यात येत असतात. या विकास कामांची परिपूर्ण माहिती न घेता व कोणतीही वस्तुस्थिती व कायदेशीर बाबी विचारात न घेता केवळ अपुऱ्या माहितीच्या आधारे ही कामे निकृष्ट दर्जाची करण्यात आलेली आहेत, असा बिनबुडाचा आरोप काही सामाजिक कार्यकर्ते करीत आहेत. काळम्मावाडी वसाहतीमधील जलकुंभ उभारणीच्या कामाबरोबरच गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित राहिलेले शहरांच्या सिटी सर्व्हेचे कामही लवकरात लवकर सुरू होणार आहे. त्यामुळे शहरवासीयांना शासकीय लाभ मिळण्यास सोपे होईल. शहरातील २०११पूर्वीचे अतिक्रमण शासनाच्या निर्देशानुसार कायम करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी नगराध्यक्षा गाट यांनी दिली. मुख्याधिकारी स्नेहलता कुंभार -ढेरे, पक्ष प्रतोद रफिक मुल्ला,नगरसेवक सूरज बेडगे, बाळासाहेब मुधाळे, सुभाष कागले, गणेश वाईंगडे,लक्ष्मी साळुंखे, अनिता मधाळे, बांधकाम अभियंता जावेद मुल्ला आदी यावेळी उपस्थित होते.
भ्रष्टाचाराचे आरोप बिनबुडाचे : गाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 4:28 AM