गडहिंग्लज : १५ वर्षे महाराष्ट्रात आघाडीचे सरकार सत्तेत होते. मात्र, प्रत्येक जिल्ह्यात गटा-तटात भांडणे लावून विकासाचे प्रश्न वर्षानुवर्षे रखडत ठेवले. काँगे्रस-राष्ट्रवादीने केवळ मौजमजा केली आणि महाराष्ट्राची विकासाची १५ वर्षे फुकट घालवली, अशी टीका युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी केली.कागल व चंदगडविधानसभा मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. खासदार संजय मंडलिक यांची प्रमुख उपस्थिती होती. शहरातील म. दु. श्रेष्ठी विद्यालयाच्या पटांगणात ही सभा झाली.ठाकरे म्हणाले, युतीमध्ये कोणतेही छुपे वार, गनिमी नाही, जे कांही आहे ते समोरासमोर आहे. आघाडी मात्र फक्त बिघाडीसाठीच बनली असून महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी महायुतीच सक्षम आहे. नवा महाराष्ट्र घडविण्यासाठीच महायुती झाली आहे.मंडलिक म्हणाले, मागील विधानसभा निवडणुकीतच शिवसेनेचे उमेदवार कागल व चंदगडमधून निवडून द्यायला पाहिजे होते. गडहिंग्लज विभागातील रखडलेली विकासकामे आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीलाच साथ द्या.
शिवसेनेचे कागलचे उमेदवार संजय घाटगे व चंदगडचे उमेदवार संग्रामसिंह कुपेकर यांचीही भाषणे झाली. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख विजय देवणे व संजय पवार, अंबरीश घाटगे, प्रभाकर खांडेकर, सुनिल शिंत्रे, विरेंद्र मंडलिक, संभाजी भोकरे, उत्तम कांबळे, जयश्री तेली, विठ्ठल पाटील, प्रकाश पाटील, श्रद्धा शिंत्रे, शशीकला पाटील, रियाज शमनजी आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. दिलीप माने यांनी सूत्रसंचलन केले. वरळीत उभारणार कोल्हापूर भवनचंदगड, आजरा, गडहिंग्लजसह कोल्हापूर जिल्ह्यातील असंख्य नागरिक नोकरीच्या निमित्ताने मुंबईत स्थायिक झालेले आहेत. त्यांच्यासाठी वरळीमध्ये आपण कोल्हापूर भवन उभारणार असल्याची ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.