शहरं
Join us  
Trending Stories
1
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
2
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
3
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
4
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
5
NTPC Green IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
6
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
7
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
8
मतदानाच्या एक दिवस आधीच ठाकरे गटाला धक्का; डोंबिवलीतील नाराजीचा शिंदे गटाला फायदा
9
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?
10
IPL 2025 Mega Auction : या ३ भारतीय अष्टपैलू खेळाडूंवर लागू शकते मोठी बोली
11
जो बायडेन यांना तिसरं महायुद्ध हवंय का? 'या' निर्णयावर ट्रम्प यांच्या मुलाने उपस्थित केला प्रश्न...
12
Maharashtra Election 2024: ‘या’ मतदारसंघांमध्ये विद्यमान आमदार लढवत नाहीये निवडणूक! काय आहेत कारणे?
13
गुजरातेत रॅगिंगने घेतला एकाचा बळी; साडेतीन तास उभे राहण्याची केली सक्ती
14
"वडील मुलांसाठी जे करतात त्याविषयी...", अभिषेक बच्चनचे शब्द ऐकून Big B भावुक
15
Baba Siddique : ऑपरेशन बाबा सिद्दिकी डिकोड: App ने कॉन्टॅक्ट, जेलमधून शूटर्सचा इंटरव्ह्यू...; 'असा' रचला कट
16
T20I Record : टीम इंडियानं वर्ष गाजवलं अन् पाकिस्तानच्या संघानं 'लाजवलं'
17
Pakistan Latest News पाकिस्तानात हाहा:कार! नऊ दहशतवाद्यांचा खात्मा, सात सुरक्षारक्षक ठार, सात पोलीस 'किडनॅप'
18
वंचितचे कळमनुरी मतदारसंघातील उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्यावर हल्ला
19
"...अन्यथा माझा बाबा सिद्दिकी व्हायला वेळ लागणार नाही", शरद पवार गटाच्या रमेश कदमांना जीवे मारण्याची धमकी 
20
नीरव मोदी-विजय माल्ल्यावर कारवाई होणार! PM मोदींनी ब्रिटनसमोर उपस्थित केला मुद्दा

महापालिकेच्या अधिकाऱ्यांना घेराव

By admin | Published: March 24, 2015 12:03 AM

ड्रेनेजप्रश्नी आंदोलन : अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी नगरसेविकेसह दोघांना नोटिसा

सांगली : सांगलीवाडी येथील ड्रेनेजच्या कामावरून नगरसेविका वंदना कदम यांचे पती सचिन कदम यांच्या नेतृत्वाखाली सांगलीवाडीतील काही नागरिकांनी महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर आज (सोमवारी) हल्लाबोल केला. अधिकाऱ्यांना घेराव घातला. एका कार्यकर्त्याने अधिकाऱ्यांना शिवीगाळ केल्याने तणाव निर्माण झाला. आयुक्त अजिज कारचे यांच्याकडे अधिकाऱ्यांनी तक्रार केल्यानंतर नगरसेविका कदम व त्यांचे पती सचिन कदम या दोघांना आयुक्तांनी नोटीसवजा पत्र दिले. यापुढे असे प्रकार घडले, तर कारवाईचा इशारा पत्राद्वारे दिला आहे. सांगलीवाडी येथील ड्रेनेज योजनेची मंजूर कामे रद्द करून ती नगरसेवकांच्या इशाऱ्याने अन्य भागात वळविण्यात आल्याची टीका करीत सचिन कदम व त्यांच्या सांगलीवाडीतील समर्थकांनी हिराबाग येथील पाणीपुरवठा केंद्रावर हल्लाबोल केला. मोर्चाने दाखल झाल्यानंतर पाणीपुरवठा अधिकारी जे. व्ही. गिरी यांच्या दालनात त्यांनी मोर्चा वळविला व त्यांना घेराव घातला. अधिकाऱ्यांनी त्यांना शांततेचे आवाहन केले. तरीही समर्थक शांत होण्याच्या मनस्थितीत नव्हते. एका संतप्त समर्थकाने गिरी यांना शिवीगाळ केली. त्यामुळे वातावरण तापले. याप्रश्नी लगेच निर्णय न घेतल्यास दालनाबाहेर पडू न देण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. महापालिका आयुक्तांना याची माहिती मिळताच त्यांनी उपायुक्त प्रशांत रसाळे आणि सहायक आयुक्त रमेश वाघमारे यांना पाणीपुरवठा विभागात पाचारण केले. दोन्ही अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत घातली. दोन नगरसेवकांमधील या वादामुळे अधिकारी वेठीस धरले गेल्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. सांगलीवाडीत इस्लामपूर रस्ता व समडोळी रस्ता अशा दोन ठिकाणी २२00 मीटर ड्रेनेजचे काम मंजूर आहे. त्यानंतर धरण रस्ता व अन्य भागातील १६00 मीटर रस्त्याचेही अतिरिक्त काम मंजूर करण्यात आले आहे. सांगलीवाडीतील दत्तनगर येथेही ड्रेनेजचे काम करावे, अशी मागणी कदम यांनी केली होती. इस्लामपूर रस्त्यावरील मंजूर काम रद्द करून नगरसेवक दिलीप पाटील यांनी हे काम आपल्या भागात पळविल्याची तक्रार कदम दाम्पत्याने केली आहे. दुसरीकडे दिलीप पाटील यांनी, मंजूर कामे रद्द केली नसल्याचे सांगत, तसे पुरावे सादर करावेत, अशी भूमिका घेतली आहे. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांकडून लेखी पत्रपाणीपुरवठा अधिकारी गिरी आणि जलनिस्सारण अधिकारी एस. जी. कुलकर्णी यांनी घडलेल्या प्रकाराबाबत आयुक्तांना पत्र लिहिले. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, संबंधित आंदोलनकर्त्यांनी अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली आहे. निर्णय झाला नाही, तर अधिकाऱ्यांवर विनयभंगाचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे आम्हाला महापालिकेत काम करणे मुश्किल झाले आहे. अशाप्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देणाऱ्यांना योग्य त्या सूचना द्याव्यात.सांगलीवाडीतील एका आंदोलनकर्त्याने रॉकेलचा कॅन आणला होता. त्याने आत्मदहनाचा इशारा दिल्याने अधिकाऱ्यांची चिंता वाढली होती. अखेर त्याला समजावण्यात अधिकाऱ्यांना यश आले. दोघांना नोटिसा अधिकाऱ्यांनी लिहिलेल्या पत्राची गंभीर दखल आयुक्तांनी घेतली. त्यांनी तातडीने नगरसेविका व त्यांचे पती सचिन कदम यांना सूचनावजा पत्र दिले. अशाप्रकारची भाषा अधिकाऱ्यांना वापरून त्यांना वेठीस धरणे चुकीचे आहे. दम देणे अयोग्य असल्याने नाईलाजास्तव कारवाई करावी लागेल, असा इशारा आयुक्तांनी दिला आहे.