जिल्ह्यातील सर्वच पोलीस ठाण्यांतर्गत येणारा सर्व स्टाफ, अधिकारी तसेच होमगार्ड व त्यांच्या कुटुंबीयांना रोग प्रतिकारक शक्ती वाढविणारे डोस ज्या-त्या पोलीस ठाण्यात जाऊन वाटप करण्यात आले. पोलीस सुरक्षित, समाज सुरक्षित या उपक्रमांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच पोलिसांसाठी 'सुरक्षा कवच' देण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये तीन हजार पोलीस कर्मचारी व कुटुंबीय, १५०० होमगार्ड यांना सुरक्षा कवच देण्यात आले.
पोलीस फ्रेंडस् वेल्फेअर असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष गजानन चिंचवडे व पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष विनेश भोजे यांच्या मार्गदर्शनाखाली असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष व अॅड. विजय जमदग्नी, हातकणंगले तालुकाध्यक्ष संतोष कुंभार, उत्कर्ष निकम यांनी हा उपक्रम राबविला. या उपक्रमास इचलकरंजीचे डॉ. नितीन मोकाशी व डॉ. रजनी मोकाशी यांचे सहकार्य लाभले.
फोटो - २६०५२०२१-जेएवाय-०१
फोटो ओळी - कोल्हापूर जिल्ह्यातील पोलीस बांधवांना बूस्टर डोसचे वाटप करण्यात आले. यावेळी विजय जमदग्नी, संतोष कुंभार, उत्कर्ष निकम उपस्थित होते.